चांदीच्या मोराने नशीब उजळेल

चांदीच्या मोराने नशीब उजळेल

चांदी अत्यंत शुभ धातू आहे. या धातूने तयार वस्तूंमुळे शुभ फल मिळतात. चांदीचे दागिने, देवाच्या चांदीच्या मूर्ती, चांदीची भांडी याप्रकारे चांदी अनेक वस्तू तयार करण्यात वापरली जाते. त्याचप्रकारे चांदीचा मोर देवतांना अती प्रिय असल्याचे मानले जाते. देवी सरस्वती, प्रभू श्रीकृष्ण, कार्तिकेय व गणपतीच्या फोटोत आपल्याला मयूर बघायला मिळतात. आज जाणून घ्या घरात चांदीचा मोर ठेवल्याचे काय फायदे आहेत ते..

1. नाचत असलेला चांदीचा मोर घरात असल्याने धनासंबंधी अडचणी दूर होतात.

2. चांदीचा मोर दाम्पत्य जीवनात प्रेम व शांती ठेवण्यास मदत करतो.

3. चांदीच्या करंड्यावर चांदीचा मोर असल्यास अखंड सौभाग्याचे प्रतीक आहे.

4. घराच्या बैठकीत चांदीचा मोर यशाचे संकेत देतो.

5. देवघरात स्थिर चांदीचा मोर ठेवल्याने पुण्य प्राप्ती होते. जीवनात यश प्राप्ती होते.

6. अविवाहित किंवा विवाहास इच्छुक नसलेल्या लोकांच्या खोलीत चांदीचा मोर ठेवल्याने त्यांच्या मनात प्रेम व विवाह याप्रती कल वाढतो.

7. भाग्य उजळण्यासाठी पौर्णिमेला चांदीचा मोर घरी आणून त्याची पूजा करून तिजोरीत ठेवावा.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com