आध्यात्मिकतेची संस्कृती

आध्यात्मिकतेची संस्कृती

मानवी बुद्धिला जीवन आणि त्यापलीकडे काय आहे याचा शोध घेणे स्वाभाविक आहे. जीवनाचे अवलोकन करणे आणि ते जाणून घेण्यासाठी आतुर असणे. वास्तविकता अशी असताना, तुम्ही अध्यात्म कसे टाळू शकता? दीर्घकाळापासून तुम्ही हे टाळत आला आहात कारण जे तुम्ही नाही. अशा अनेक गोष्टींप्रती तुम्ही आसक्त झाला आहात आणि तुमची ओळख बांधली आहे. जेव्हा मी जे तुम्ही नाही अशा गोष्टी असे म्हणतो, तेव्हा त्यात तुमचे शरीर आणि मन सुद्धा सामील आहे. एकदा तुम्ही जे नाही अशा गोष्टींसोबत तुमची ओळख बांधली की तुमची बुद्धि विकृत होते. आणि मग ती काहीही स्पष्टपणे पाहू शकत नाही कारण त्या क्षणापासून ती केवळ त्या ओळखीच्या चौकटीतूनच कार्य करू लागते. समजा तुम्ही म्हणालात, मी एक स्त्री आहे, मग तुमची विचार करण्याच्या पद्धत, तुमच्या भावना, सर्व काही एका स्त्रीसारखे असणार. म्हणजे तुम्ही तुमच्या शरीराच्या काही अवयवांसोबत तुमची ओळख जोडली.

यासाठीच अध्यात्मिक प्रक्रिया आवश्यक ठरतात. जर लोक सहज, निरागस असते तर अध्यात्म ही एक नैसर्गिक गोष्ट असली असती. तुमच्या सभोवताली दृष्टीक्षेप टाकणे आणि जीवनाच्या भौतिकतेच्या पलीकडे काहीतरी आहे याची जाणीव होणे फार स्वाभाविक आहे. आणि हे जाणून घेणे सुद्धा फार सोपे आहे. पण जगातील बहुतेक लोकांच्या हे लक्षात येत नाही ही आश्चर्यकारक बाब आहे. तुम्ही जर फक्त दोन मिनिटांसाठी डोळे बंद केले तर पाहाल की तुम्ही शरीरापेक्षा जरा अधिक काहीतरी आहात हे लक्षात येईल.

एक प्रकारे, ही खरोखरच एक लाजिरवाणी गोष्ट आहे की आपल्याला लोकांना त्यांच्या आध्यात्मिकतेबद्दल आठवण करून द्यावी लागत आहे. आम्हाला आध्यात्मिक प्रक्रिया दैनंदिन जीवनाचा भाग व्हावा अशी इच्छा आहे. जशी एक आई आपल्या मुलाला दात घासण्यास शिकविते त्याप्रमाणे, आपल्याला आध्यात्मिक प्रक्रिया देखील तशी व्हायला हवी आहे. कोणत्याही प्रयत्नांशिवाय, आईच्या नकळेत, आपल्या मुलाला आध्यात्मिक प्रक्रिया शिकवते. केवळ दोन पिढ्यांपूर्वी या संस्कृतीत अशी पद्धत होती. आजही भारतात, अध्यात्मिक प्रक्रिया कोणत्याही एका संस्थे किंवा संघटनेद्वारे नियंत्रित केले जात नाही. जगाच्या इतर भागात जसे केले जाते तसे इथे कोणीही मार्गदर्शन व नियंत्रण करणारी एकच व्यक्ती किंवा संस्था नाही. प्रत्येकाच्या आयुष्याचा हा एक अविभाज्य घटक आहे. प्रत्येकजण त्यांना जसे हे माहित आहे त्या मार्गाने शिकवतो. अध्यात्मिक प्रक्रिया अवघ्या जीवनाचाच एक भाग बनली होती.

हे यासारखे अनियंत्रित राहिले आहे कारण ही कधीही एक संघटित धार्मिक प्रक्रिया नव्हती. प्रत्येकाच्या सर्वोच्च कल्याणासाठी त्या फक्त विविध पद्धती आणि प्रक्रिया होत्या. हा देश पृथ्वीवरील एकमेव असा देवहीन देश आहे कारण येथे देवाची संकल्पना सक्त-साचेबद्ध ठेवलेली नाही. इथे लोक सर्व एकूणएक सर्व काही पुजत आहेत. भारतात धर्मद्रोही असा शब्द नाही कारण प्रत्येक माणसाला कशाबद्दल तरी प्रेम किंवा भक्ती आहे. कुणाचं त्यांच्या आईवर प्रेम आहे, कुणाला त्यांच्या देवावर, कुणाला पैशाची आवड आहे, कुणाला त्यांच्या कामावर प्रेम आहे, कुणाला त्यांच्या कुत्र्यावर प्रेम आहे, तर कुणाला त्यांच्या गाईवर प्रेम आहे. काहीही असेना का, प्रत्येकजण आध्यात्मिक मार्गावर आहे. प्रश्न केवळ हा आहे की त्याचा आध्यात्मिक मार्ग कमकुवत आहे की मजबूत; पण आध्यात्म मार्गी नाही असा कोणीही नाही. प्रत्येकजण आपापल्या स्वत:च्या ढोबळ मार्गाने आध्यात्माची वाटचाल करत आहेच.

Related Stories

No stories found.