‘फिल्मी कट्टा’मध्ये रंगला भविष्याची ऐशी तैसी

0
नाशिक । ‘भविष्याची ऐशी तैसी’ चित्रपटाच्या नियोजित प्रसिद्धीचा कार्यक्रम नुकताच फिल्मी कट्टा संस्थेमार्फत पार पडला. फिल्मी कट्टा आणि नाट्यरसिकच्या कलाकारांनी लघू नाटिका तसेच सिनेमातील गाण्यांवरील नृत्यांद्वारे चित्रपटाच्या संकल्पनेवर प्रकाश अभिनव पद्धतीने प्रकाश टाकला.

याप्रसंगी फिल्मी कट्टाचे संस्थापक दीपक चव्हाण यांनी चित्रपटाचे निर्माते रमेश तलवारे, लेखिका,गीतकार चंद्रा तलवारे, कलाकार संदीप कोच्चर, रुचिता जाधव, स्वप्निल जोशी (नवोदित) आणि प्रवीण तलवारे यांच्या छोटेखानी मुलाखतींमधून चित्रपटाची संकल्पना उलगडत नेली.

प्रमोशनची नावीन्यपूर्ण संकल्पना दीपक चव्हाण यांच्या ‘फिल्मी कट्टा’या पुणेस्थित संस्थेची आहे. शोचे दिग्दर्शक कुणाल निंबाळकर, निवेदक सारंग अग्निहोत्री, नृत्य दिग्दर्शक सौरभ, संभाजी यांचा या उपक्रमात महत्त्वपूर्ण वाटा होता. नाशिकच्या नाट्यरसिक संस्थेने या संकल्पनेलाा मूर्त रुप दिले.

चित्रपटाशी संबंधित काही प्रश्नोत्तरात नाट्यरसिकचे गितांजली घोरपडे, समीर तोरस्कर व इतरांनी सहभाग घेतला. हॅलो जिंदगीचे सभासद, दिग्दर्शक सुहास भोसले, सहनिर्माती प्रियांका पाटील, रंजना, दिग्दर्शक महेंद्र, अनिल गडाख यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते.

येत्या शुक्रवारी (दि.6 ) भविष्याची ऐशी तैशी चित्रपटत राज्यभर प्रदर्शित होत असून त्याचा आनंद घेण्याचे आवाहन निर्माते तलवारे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*