भऊरमध्ये गावठी दारू अड्डे उद्वस्थ

0

भऊर (बाबा पवार) : देवळा तालुक्यातील भऊर येथे आज गुप्त माहितीच्या आधारे गिरणा नदिच्या काठाजवळील चंबळखोरे या भागात अचानक कळवण राज्य उत्पादन शुल्क विभागाने टाकलेल्या धाडीत दोन भटट्या उध्वस्त करण्यात आल्याची माहिती प्राप्त होते आहे.

दरम्यान, राज्य उत्पादन ची गाडी गावात शिरताच माहिती पसरली असावी म्हणून याठिकाणी भट्टीजवळ कोणीही नव्हते असे सांगण्यात आले आहे.

यामुळे दोन बेवारस गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत ८०० लीटर गावठी रसायन (अंदाजित किंमत १८ हजार ५०० रूपये) नाश करण्यात आले.

येथे मडके, प्लास्टिक ड्रम, लोखंडी ड्रम इत्यादी पोलीस पाटील भरत पवार यांच्या समक्ष फोडण्यात आले. पी.बी.आहेरराव दुय्यम निरिक्षक राज्य उत्पादक शुल्क कळवण विभाग, सादुनि एम. डी. गरुड, जवान कडलग, माने, व तडवी यांच्या पथकाने कारवाई केली.

LEAVE A REPLY

*