भाऊ कदमचे डिजिटल माध्यमात पदार्पण

0
मुंबई – चला हवा येऊ द्या या लोकप्रिय कार्यक्रमात आपल्या विनोदी शैलीने सर्वांना हसायला लावणार्‍या भाऊ कदमने डिजिटल माध्यमात पदार्पण केले आहे. झी 5 अ‍ॅपवर नुकतीच दाखल झालेल्या लिफ्टमन या मराठी वेबसीरिजमध्ये ते मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यात प्रेक्षकांना सिच्युएशनल कॉमेडीचा आस्वाद घेता येणार आहे. लिफ्टमन या मालिकेचे बहुतेक शूटिंग लिफ्टमध्ये झाले असून खाली-वर जाण्याच्या प्रवासात भाऊ आणि त्यांच्या विनोदबुद्धीचा सामना करावा लागलेली अनेकविध व्यक्तिमत्व या मालिकेतून समोर येतात. लिफ्टमन ही 10 भागांची वेब मालिका असून प्रत्येक भाग 8-10 मिनिटांचा आहे. प्रेक्षकांना वन लाइनर्स आणि विनोदांनी भरलेल्या गमतीशीर लिफ्टसफरीला तो घेऊन जाईल.

LEAVE A REPLY

*