कारेगावच्या वारकर्‍यांकडून भास्करगिरी महाराजांचा सत्कार

0
श्रीरामपूर (प्रतिनिधी)- पंढरपूर देवस्थानच्या विश्‍वस्तपदी निवड झाल्याबद्दल महंत भास्करगिरी महाराज यांचा श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव येथील कारेगाव ते श्रीक्षेत्र देवगड पायी दिंडीने जाणार्‍या वारकर्‍यांनी सत्कार सोहळा आयोजित केला होता. या वारकर्‍यांनी संतपूजन करुन सत्कार केला.
गेल्या 15 वर्षापासून श्रावण महिन्यातील दर गुरुवारी श्रीक्षेत्र देवगड येथे दिंडी नेली जाते. या दिंडीत सुमारे एक हजाराहून अधिक भाविक सहभागी होत असतात. या दिंडीत चहा, पाणी, नाश्ता, फराळे, फळे, व महाप्रसादाची पंगतही दिली जाते.
दिंडी सोहळ्याच्या पहिल्याच गुरुवारी म्हणजे 27 जुलै रोजी महंत भास्करगिरी महाराज यांची पंढरपूर देवस्थानच्या विश्‍वस्तपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी अशोक कारखान्यो माजी संचालक रामदास पटारे, शिवाजी महाराज तर्‍हाळ, लक्षमणराव पटारे, शिवाजी देठे, सतिश लव्हाटे, साहेबराव बोठे, आप्पासाहेब पटारे, गोरक्षनाथ बोरुडे, बाळू महाराज कानडे, मोटे महाराज, बबनराव वरघुडे, बाळासाहेब कवडे, जालिंदर होले, दिपक बनसोडे, भजनी मंडळ तसेच वारकर्‍यांनी संत पूजन करुन त्यांचा सत्कार केला.

LEAVE A REPLY

*