पंढरपुरातील स्वच्छतेकडे लक्ष देऊ : भास्करगिरी महाराज

0
भेंडा (वार्ताहर) – भाविकांच्या सुविधा व स्वच्छता याकडे विशेष लक्ष देऊन पंढरपूर देवस्थानचा जगात चांगला ठसा उमटेल असेच काम करू अशी ग्वाही पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे विश्‍वस्त महंत भास्करगिरी महाराज यांनी दिली.
ज्ञानेश्‍वर सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाच्यावतीने माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांच्या हस्ते भास्करगिरी महाराज यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी महाराज म्हणाले, सर्व समाजाची भक्ती, शक्ती आणि युक्ती आमच्या वारकर्‍यांच्या पाठीशी असेल तर आध्यात्मिक क्षेत्रातूनही चांगले सामाजिक कार्य घडवता येते.
पांडुरंगाच्या दरबारातील कार्य करणे ही तारेवरची कसरत आहे. भक्तांसाठी सुविधा, स्वच्छता यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. पंढरपूरचे आध्यात्मिक वैभव टिकवून ठेवण्याचे दायित्व आपल्या सर्वांवर आहे. शेवटच्या श्‍वासापर्यंत पांडुरंगाचे पाईक राहून भक्तांचे कार्य करीत राहू अशी ग्वाही दिली.
यावेळी ज्ञानेश्‍वर महाराज मंदिराचे विश्‍वस्त शिवाजी महाराज देशमुख, महंत सुनीलगिरी महाराज, कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, आमदार बाळासाहेब मुरकुटे, शेवगाव पंचायत समिती सभापती डॉ. क्षितिज घुले, अ‍ॅड. देसाई देशमुख, मुळा कारखान्याचे उपाध्यक्ष भाऊसाहेब मोटे,
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, दिलीपराव लांडे, काशीनाथ नवले, दिलीप मोटे, कारखान्याचे कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सरव्यवस्थापक काकासाहेब शिंदे, प्रशासकीय अधिकारी कारभारी गायके, कामगार संघटनेचे सेक्रेटरी जनार्दन कदम, उपाध्यक्ष भाऊसाहेब चौधरी, कार्याध्यक्ष सुखदेव फुलारी, अशोक भूमकर, मच्छिंद्र साळुंके, संभाजी माळवदे, मच्छिंद्र वेताळ आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*