लॉजिंग पद्धती येऊ न देता देवस्थानांचे पावित्र्य राखा

0
देवगड फाटा (वार्ताहर)- प्रत्येक देवस्थानाचे पावित्र्य राखले गेले पाहिजे. त्याला पर्यटनाचे स्वरुप येऊ देऊ नये. देवस्थाने ही लॉजिंग पद्धतीची बनू नयेत अशा अपेक्षा श्रीक्षेत्र देवगड संस्थानचे महंत व पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचे विश्‍वस्त भास्करगिरी महाराज यांनी केले. नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथे श्री दत्त जयंती महोत्सवाच्या काल्याच्या किर्तनात ते बोलत होते.
8 दिवस दत्तजयंतीनिमित्त श्रीक्षेत्र देगवड येथे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमांची काल सोमवारी सकाळी ज्ञानसागर सभामंडपात भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते दहीहंडी फोडून काल्याच्या किर्तनाने सांगता झाली. त्यावेळी ते बोलत होते. भास्करगिरी महाराज म्हणाले, गंगा दूषित करण्याचे काम आपण सर्वांनी मिळून थांबवले पाहिजे. गंगेवर विधी करा परंतु गंगेत राख, कपडे इतर साहित्य जास्त प्रमाणात टाकू नका. दोन चमचे राख गंगेत टाका उरलेली शेतातील झाडांना टाका.
देवाचे कार्य करताना ते श्रद्धापूर्वक करत राहिले पाहिजे. श्रध्देने केलेली भक्ती फलद्रुप होते असे स्पष्ट केले. प्रत्येक देवस्थानचे पावित्र्य राखले गेले पाहिजे. त्याला पर्यटनाचे स्वरूप नको. तसेच देवस्थाने ही लॉजिंग पद्धतीचीही नकोत अशा त्यांनी सूचना केल्या. जीवनातील कुरकूर संपवायची असेल तर जीवनात ईश्‍वर चिंतन करा. गोमतेचे रक्षण करा. त्यांना कत्तलखान्यात पाठवून पुढील पिढीला लागेल असा तळतळाट घेऊ नका असे आवाहनही त्यांनी केले. महाद्वारामध्ये भास्करगिरी महाराजांनी काल्याची दहीहंडी फोडली.
दत्त जयंती सप्ताह काळात योगदान देणार्‍या स्वयंसेवक, यात्रा कमेटी, प्रशासकीय अधिकारी, संत महंत, शाळेतील स्वयंसेवक आदी सर्व भक्त मंडळाचे भास्करगिरी महाराज यांनी आभार मानले.
यावेळी भास्करगिरी महाराजांच्या आई सरूआई पाटील, नाना महाराज उजवणे, जगन्नाथ महाराज वसू, ओंकार महाराज, मधुकर पिसोडे, गंगापूरचे माजी आमदार अण्णासाहेब माने, संतोष माने, बाळासाहेब पाटील, आप्पासाहेब माने, गहिनीनाथ महाराज आढाव,
नारायण महाराज ससे, अतुल महाराज आदमने, पवार महाराज, राजेंद्र महाराज आसने, बदाम पठाडे, गणपत महाराज आहेर, कल्याण महाराज पवार, बाळू महाराज कानडे, मारोती महाराज काळे, रामनाथ महाराज पवार, राम विधाते, बजरंग विधाते, सुनील नाळके, संजय नेऊलकर, विजय गांधी, महेश महाराज शेजुळ, पंढरीनाथ महाराज, पंढरीनाथ शेळके, मृदुंगाचार्य गिरीजानाथ जाधव, दादासाहेब साबळे,
देवगड संस्थानचे चांगदेव साबळे, महेंद्र फलटणे, बबनराव वरकघूडे, ज्ञानदेव लोखंडे, अंबादास फोलाने, विवेक साबे महाराज, वाल्मिक सोनवणे, कैलास बोडखे, राजू गीते, भाऊसाहेब कोकणे, शेतकरी नेते पी. आर. जाधव, अजय साबळे, संदीप साबळे, पुजारी दत्ता महाराज, यांच्यासह हजारोंच्या संख्येने महिला व पुरुष भाविक उपस्थित होते.
यावेळी मलकुजी माने, दत्तात्रय मगर, भाऊसाहेब गायकवाड, आबासाहेब आहेर, अण्णासाहेब शेलार, प्रेमचंद विखोना, शंकरराव गोरे, फकिरराव होंडे यांच्यावतीने महाप्रसाद देण्यात आला.

 

LEAVE A REPLY

*