तीर्थक्षेत्र व नदीच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी : भास्करगिरी

0

जुने कायगाव येथे अस्थिकुंडाचे लोकार्पण

देवगड फाटा (वार्ताहर)– भाविक भक्तांनी आपल्या तीर्थ क्षेत्राचे स्थान प्रदूषित करू नये, ते स्थान निटनेटके स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी. तसेच गोदामाई नदीचे पावित्र्य जपून ती स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन श्रीक्षेत्र देवगडचे महंत भास्करगिरी महाराज यांनी केले.
रविवार दि. 19 रोजी सायंकाळी जुने कायगाव येथे युवासेना औरंगाबाद जिल्हाध्यक्ष संतोष माने यांच्या प्रयत्नातून बांधण्यात आलेल्या 60 लक्ष रूपये खर्चाच्या अस्थिकुंड, सभामंडप व सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे लोकार्पण भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना उपनेते व खासदार चंद्रकांत खैरे, माजी आमदार व शिवसेना संपर्कप्रमुख अण्णासाहेब माने, जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर, कैलासगिरी महाराज, जनार्धन मेटे महाराज, बाळकृष्ण महाराज दिघे, सुखदेव खेडकर महाराज, जिल्हा दूध संघाचे संचालक दिलीप निरपळ उपस्थित होते. भास्करगिरी महाराज म्हणाले व्यक्ती मृत झाल्यानंतर तिचा दशक्रिया विधी शास्त्रीय पध्दतीने केलाच पाहिजे.
पण एक चूक होते घरातील व्यक्ति माणूस गेल्यानंतर लोक मृत व्यक्तीचे जुने कपडे, चपला, बूट व इतर साहित्य गंगेत टाकतात. पण मृताच्या अंगावरील सोने, चांदी काढून घेतात.ते टाकत नाही. भक्तगणांनो गंगेचे पावित्र्य जपा, ती स्वच्छ ठेवा. मृत व्यक्तीची मुठभर राख, अस्थि गंगेची पूजा करून अस्थि कुंडात टाका. उरलेली राख शेतात टाका तेथे वडीलधार्‍यांची स्मृती म्हणून झाड लावा. सावलीबरोबरच पर्यावरण समतोल राहण्यास त्यामुळे मदत होईल असे आवाहन केले.
यावेळी खासदार चंद्रकांत खैरे, माजी आमदार अण्णासाहेब माने, जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर, संतोष माने यांची आदींची भाषणे झाली. यावेळी जिल्हा परिषद सदस्या स्वाती निरपळ, मनीषा सितलंबे, गंगापूरच्या उपनगराध्यक्षा मंगलबाई राजपूत, माजी सभापती मारोती साळवे, तालुका प्रमुख दिनेश मुथा, सरपंच मीनाक्षी गायकवाड, युवासेनाचे मच्ंिछद्र देवकर, तहसीलदार चंद्रकांत शेळके, विभाग प्रमुख बाळासाहेब शिंदे,
उपसरपंच हारुण शेख, माजी सरपंच काकासाहेब महसरूप, कायगाव विविध सेवा संस्थेचे अध्यक्ष संजय गायकवाड, तलाठी सतीश क्षीरसागर, रामेश्‍वर मंदिर संस्थान अध्यक्ष बाळकृष्ण गायकवाड, उपाध्यक्ष चांगदेव गायकवाड, सचिव सचिन भोगे, यादव इष्टके, माजी सरपंच अनिल उचित, पोपटराव फाजगे, समाधान गायकवाड, संचालक सोमनाथ गायकवाड, अनिल बिरुटे, अशोक कान्हे, संतोष पंढुरे, अमोल गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य, रामेश्‍वर मंदिर ट्रस्ट सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*