Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

अयोध्या निकालानंतर तेढ निर्माण होईल असे वातावरण निर्माण करू नका

Share

भास्करगिरी महाराज यांचे आवाहन

नेवासा (तालुका वार्ताहर)- अयोध्येच्या निकालानंतर तेढ निर्माण होईल असे वातावरण निर्माण करू नका. कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. त्यासाठी सर्वांनी संयम बाळगावा असे आवाहन विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय मार्गदर्शक व नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड गुरुदेवदत्त पिठाचे प्रमुख भास्करगिरी महाराज यांनी केले आहे.

देवगड येथे बोलताना ते म्हणाले, संस्कृती व संस्काराने नटलेला जगाच्या पाठीवर भारत हा एकमेव देश असून जगा आणि जगू द्या, हे तत्व अंगिकारणारा देश आहे. माणूस हीच जात व माणुसकी हा धर्म अशी शिकवण येथील संतांनी दिली आहे. गेल्या 400 वर्षांपासून राममंदिराचा हा प्रश्न प्रलंबित आहे त्याचा निकाल थोड्याच दिवसावर येऊन ठेपला आहे. प्रभू रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण, शंकर भगवान ही देशाची अस्मिता आहे. या देवतांनाच कुणी अल्ला तर कुणी गॉड म्हणते. या देवतांचा आशीर्वाद सर्वांनाच आहे. आयोध्येचा निकाल लागल्यानंतर सर्वधर्मीय लोकांनी कोर्टाच्या या निकालाचा स्वीकार करावा. तेढ निर्माण होणार नाही, कुणाच्याही भावना दुखावल्या जाईल ही भावना अंतःकरणात निर्माण होऊ देऊ नका.आपल्या गैरकृत्याने देश बदनाम होईल असे वातावरण निर्माण करू नका असे आवाहन केले.

या निकालाने कुणाचा जय कुणाचा पराजय असा प्रश्न नाही तर हा अस्मितेचा प्रश्न असल्याने सर्वांनी न्यायदेवतेचा निकाल एकदिलाने स्वीकारावा. कुणीही यासाठी मिरवणुका काढू नका असे आवाहन केले. कीर्तनकारांनी देखील कीर्तनाच्या माध्यमातून इतर समाज दुखावेल अशी वाच्यता करू नये अशी अपेक्षा व्यक्त केली.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!