योगसाधना सर्वांनी स्वीकारावी : भास्करगिरी

0
देवगड फाटा (वार्ताहर) – योग साधना ही कुठल्या जातिधर्मासाठी नसून ती सर्वांनी स्वीकारावी असे आवाहन श्रीक्षेत्र देवगडचे महंत भास्करगिरी महाराज यांनी केले. देवगड येथे मोठे योग शिबिर आयोजित करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.
श्री क्षेत्र देवगड येथे पतंजली योग समिती आयोजित सहशिक्षक योगा प्रशिक्षण शिबिर प्रमाणपत्र वाटप प्रसंगी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. यावेळी भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते 30 सहयोग शिक्षकांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
यावेळी भास्करगिरी महाराज म्हणाले, योग साधना ही सर्वांनी स्वीकारली पाहिजे. योग साधना ही कुठल्या जातिधर्मासाठी नसून ती सर्वांसाठी आहे. स्वामी रामदेव बाबा योगासाठी दहा ते बारा वर्षांपासून काम करत आहेत. योग साधना ही जगात स्वीकारली जात आहे. श्री क्षेत्र देवगड येथे सुद्धा मोठे योग शिबिर आयोजित करण्याचा मानस असल्याचे महाराजांनी सांगितले.
नेवासा येथील असलम शेख यांना डॉक्टरांनी बायपास करण्यास सांगितले होते. मात्र नियमीत योगासन केल्याने त्यांचा होणारा खर्च वाचला असल्याचे सांगण्यात आले. महाराजांनी त्यांचे कौतुक केले.
यावेळी पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी बाळासाहेब निमसे, सौ. कल्पना ढोकळ, मधुकर निकम, नेवासा तालुका पतंजली योग समितीच्या मनीषा म्हस्के, सर्जेराव ससाणे, असलम शेख आदी उपस्थित होते. प्रास्ताविक बाळासाहेब निमसे यांनी केले.

LEAVE A REPLY

*