Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या राजकीय

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांचा राजीनामा

Share

मुंबई | प्रतिनिधी

भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा आज केंद्रीय ग्राहक, अन्न व नागरीपुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्राला आगामी विधानसभेसाठी नवा प्रदेशाध्यक्ष लाभणार आहे.

नव्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि गिरीश महाजन अशी नावे चर्चेत आहेत. यापैकी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल याबाबत निर्णय राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे घेणार असल्याचे गेल्या काही दिवसांपूर्वी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील माध्यमांशी बोलताना सांगितले होते.

दरम्यान, दानवे यांनी महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनादेखील भेटले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र पक्षाची जबाबदारी अन्य कोणाकडे द्यावी, अशी इच्छा व्यक्त केली.

तसेच आगामी विधानसभा बघता राज्याला पूर्णवेळ प्रदेशाध्यक्ष नेमावा अशी विनंतीदेखील त्यांच्याक्डून करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!