Type to search

Breaking News Featured देश विदेश मुख्य बातम्या

प्रणबदा, भूपेन हजारिका व नाना जी देशमुख यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान

Share

नवी दिल्ली | वृत्तसंस्था 

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, जनसंघाचे नेते नाना जी देशमुख आणि प्रसिद्ध गायक भूपेन हजारिका यांना आज भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.  राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारतरत्न पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती.

भारत रत्न देशातील सर्वोच्च सन्मान असून राष्ट्रीय सेवा देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार कला, साहित्य, विज्ञान, सार्वजनिक सेवा आणि क्रीडा या प्रकाराती विशिष्ट योगदानासाठी दिला जातो.

2 जानेवारी 1954 साली या पुरस्कारांची घोषणा तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्याद्वारे करण्यात आली होती. ह्या पुरस्काराचे पहिले मानकरी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे होते.

आजवरचे भारतरत्न पुरस्काराचे मानकरी 

१९५४  डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन

१९५४  चक्रवर्ती राजगोपालाचारी

१९५४  डॉक्टर चंद्रशेखर वेंकटरमण

१९५५  डॉक्टर भगवान दास

१९५५  सर डॉ. मोक्षगुंडम विश्नेश्वरैया

१९५५  पं. जवाहरलाल नेहरु

१९५७  गोविंद वल्लभ पंत

१९५८  धोंडो केशव कर्वे

१९६१  डॉ. बिधन चंद्र रॉय

१९६१  पुरुषोत्तम दास टंडन

१९६२  डॉ. राजेंद्र प्रसाद

१९६३  डॉ. झाकिर हूसैन

१९६३  डॉ. पाडूरंग वामन काणे

१९६६  लाल बहादुर शास्त्री

१९७१  इंदिरा गांधी

१९७५  वराहगिरी वेंकटगिरी

१९७६  के. कामराज

१९८०   मदर तेरेसा

१९८३ आचार्य विनोबा भावे

१९८७  खान अब्दुल्ल गफार खान

१९८८  एमजीआर

१९९०  डॉ. भीमराव रामजी आंबेडकर

१९९०  नेल्सन मंडेला

१९९१  राजीव गांधी

१९९१  सरदार वल्लभभाई पटेल

१९९१   मोरारजी देसाई

१९९२  मौलाना अब्दुल कलाम आझाद

१९९२   जे आर डी टाटा

१९९२  सत्यजीत रे

१९९७  अब्दुल कलाम

१९९७  गुलजारी लाल नंदा

१९९७  अरुणा असाफ अली

१९९८  एम एस सुब्बुलक्ष्मी

१९९८  सी सुब्रम्हण्यम

१९९८ जयप्रकाश नारायण

१९९९  पं.रवि शंकर

१९९९ अर्मत्य सेन

१९९९ गोपीनाथ बोरदोलाई

२००१  लता मंगेशकर

२००१  उस्ताद बिस्मिल्ला खाँ

२००९  पं. भीमसेन जोशी

२०१४  सी.एन.आर.राव

२०१४  सचिन तेंडुलकर

२०१५  माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी

२०१५ पं. मदनमोहन मालवीय

२०१९  माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी

२०१९  नाना जी देशमुख

२०१९ भूपेन हजारिका : गायक

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!