भारत बंदला येवल्यात संमिश्र प्रतिसाद; दूरची बससेवा बंद

0

विखरणी ( वार्ताहर) ता. १० : भारत बंदच्या पार्श्वभूमीवर येवला येथे बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

सकाळी येवल्यात बाजारपेठेतील काही दुकाने बंद असली तरी मुख्य बाजारपेठेत अनेक ठिकाणी दुकाने उघडी असल्याचे दिसून आले.

येवला आगाराची लांब पल्याची सेवा बंद आहे. मात्र ग्रामीण भागातील वाहतूक सुरळीत सुरू असल्याचे दिसून येत आहे.

येवला-शिर्डी-अ नगर,  येवला-औरंगाबाद,  येवला-नाशिक,येवला-मालेगाव-धुळे व इतर लांब पल्याची वाहतूक सुरकक्षेच्या कारणास्तव बंद असल्याची माहिती मिळत आहे.

लांब पल्याची वाहतूक बंद असल्याने काही गाड्या आगारातच उभ्या असल्याचे दिसून येत आहे एकूणच येवला शहर व तालुक्यासह ग्रामीण भागात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत असून बंद शांततेत सुरू आहे.

धुळगावला इंधन दरवाढीच्या विरोधात कडकडीत बंद

धुळगाव (वार्ताहर) : इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला धुळगाव सह तालुक्यातील ग्रामीण भागात उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या बंद मध्ये काँग्रेस पक्षाचे प्रांतिक सदस्य एकनाथ गाकवावड यांनी सक्रिय सहभाग नोंदवला असून संपूर्ण शहर कडकडीत बंद केले.या बंद मध्ये येथील मुख्य व्यवसाय दुध संकलन केंद्र सकाळ पासूनच बंद करण्यात आले आहे.

तर शेतकरी कामगार,रिक्षा,टॅक्सी, पेट्रोल पंप सहभागी झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत असून धुळगाव येथून तालुक्याला जाणाऱ्या खाजगी वाहतूक सेवा बंद करण्यात आल्याने प्रवाशांची व विद्यार्थ्यांची गैरसोय होऊन त्यांचे हाल होत आहे.

यावेळी काँग्रेस पक्षाचे एकनाथ गायकवाड, राजेंद्र गायकवाड, सुभाष नाना गायकवाड नारायण गायकवाड,भगवान गायकवाड, दत्तू खोडके, बद्रीनाथ गायकवाड,योगेश गायकवाड, भगवान भोसले, पद्माकर शिंदे,सिताराम गायकवाड या सह सर्व पक्षाचे प्रमुक कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*