Type to search

Breaking News नाशिक

सिन्नरला भारतबंदचा परिणाम नाही; मात्र बससेवा विस्कळीत

Share

सिन्नर (वार्ताहर) ता. १० : इंधन दरवाढ व भाजप सरकारच्या धोरणांच्या निषेधासाठी काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंद चा सिन्नरच्या ग्रामीण भागात कुठेही प्रभाव दिसत नाही.

मात्र एस टी बस सेवा काहीशी विस्कळीत असून उशिराने फेऱ्या होत आहेत. सकाळी लांब पल्ल्याच्या बस रस्त्यावर न आल्याने कामगार, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांचे हाल झाले.

सिन्नर आगाराच्या ग्रामीण भागातील बससेवा सकाळी पूर्ण झाल्या. मात्र नाशिककडे जाणाऱ्या फेऱ्या बंद होत्या.

बस नसल्याने त्यांना इच्छित स्थळी जायला उशीर झाला. ग्रामीण भागात सर्वच ठिकाणी व्यवसाय नियमितपणे सुरू असून सकाळच्या प्रहरात बंद चा प्रभाव कुठेही जाणवला नाही.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!