नाशिकमध्ये पेट्रोल ८८.५० वर;  बंदच्या काळातही पंपांवरील गर्दी कायम

0

नाशिक, ता. १० : पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढतच असून आज नाशिक शहरात पेट्रोल ८८.५० रुपये प्रति लिटर, तर डिझेल ७६.५० रुपये प्रति लिटर प्रमाणे विक्री होत आहे.

एक्सट्रॉ मायलेज किंवा प्रिमियम पेट्रोलने नव्वदी पार केली असून त्याचा दर ९१.२५ रुपये प्रतिलिटर इतका आहे.

इंधन दरवाढीमुळे काँग्रेससह विरोधी पक्षांनी आज भारत बंद पुकारलेला असताना दुसरीकडे शहरातील पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी नेहमीप्रमाणेच गर्दी दिसून आली. सकाळपासूनच शहरातील पेट्रोलपंप सुरळीत सुरू होते.

इंधनाच्या दरात वाढ होत असली, तरी शहरातील पेट्रोल-डिझेल विक्रीवर त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. ‘भाववाढीनंतरही पेट्रोल-डिझेलच्या विक्रीत कुठलीही घट झालेली नसून पूर्वीप्रमाणेच इंधनाची मागणी कायम आहे,’  अशी प्रतिकिया नाशिक पेट्रोल डिलर्स असोसिएशनच्या एका पदाधिकाऱ्याने देशदूत डिजिटलकडे व्यक्त केली.

पेट्रोल-डिझेल भाववाढीमुळे सामान्य जनता त्रस्त असली, तरी शहरातील सार्वजनिक वाहतुक सेवा कार्यक्षम नसल्याने नाईलाजाने स्वत:च्या वाहनाचा उपयोग करावा लागत असल्याची व्यथा काही नाशिककरांनी देशदूत डिजिटलकडे मांडली.

दरम्यान आजच्या ‘भारत बंद’च्या पार्श्वभूमीवर शहरातील बहुतेक पेट्रोलपंपांवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा हटविण्यात आली होती.

LEAVE A REPLY

*