Type to search

Breaking News नाशिक

भारत बंदला त्र्यंबकेश्वरमध्ये प्रतिसाद; कार्यकर्त्यांचे रास्ता रोको

Share

त्र्यंबकेश्वर (मोहन कानकाटे) ता. १० :

काँगेससह विरोधी पक्षांनी आज पुकारलेल्या भारत बंदला जिल्ह्यासह तालुका स्तरावर देखील मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

सकाळपासून त्र्यंबकेश्वर शहरातील दुकाने आणि आस्थापना बंद राहिल्या. तर दुपारी १२च्या सुमारास कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.

रास्ता रोको दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी केली काँग्रसचे तालुका अध्यक्ष संपतराव सकाळे यांच्या नेतृत्वाखाली हा बंद पुकारण्यात आला.

यावेळी जि.प. सदस्य  शकुंतला डगळे,  मनसे तालुकाध्यक्ष नवनाथ कोठुळे,  काँग्रसचे ज्येष्ठ नेते पांडू  मामा लांडे,  आदींसह कार्यकर्ते मोठ्या सख्येने उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!