२२ पक्षांचा ‘भारत बंद’ ला पाठींबा

0
नवी दिल्ली :  पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅस सिलेंडर भाववाढीच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे आज देशव्यापी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. दरवाढीविरोधात काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंद ला देशभरातील २२ पक्षांनी पाठिंबा दिला आहे. बंद यशस्वी करण्यासाठी या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यांवर उतरून केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे. तसेच पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याची जोरदार मागणी केली आहे.

२२ पक्षांचा ‘बंद’ ला पाठींबा 

काँग्रेसच्या भारत बंदला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राज ठाकरेंचा मनसे, द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके), समाजवादी पार्टी, मायावतींचा बसपा, ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष, लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल, डाव्यांचा सीपीआय, सीपीएम, एआयडीयूएफ, नॅशनल काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा, अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष, तेलुगु देसम पार्टी (टीडीपी), केरळ काँग्रेस, आरएसपी, आययूएमएल, शरद यादव यांचा लोकतांत्रिक जनता दल, राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि हिंदूस्तान अवाम पार्टी या पक्षांनी पाठिंबा दिला असून बंदमध्ये सहभाग घेतला आहे.

‘भारत बंद’ मध्ये शिवसेना सहभागी नाही ?  

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका फोनमुळे शिवसेना बॅकफुटवर गेल्याची माहिती समोर आली आहे. विरोधकांनी पुकारलेल्या बंदमध्ये सहभागी होऊ नका, अशी विनंती करणारा फोन अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुखन उद्धव ठाकरे यांना केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  शिवाय, आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा-शिवसेनेच्या युतीमध्ये फूट पडू नये, यासाठीदेखील भाजपाकडून जोरदार प्रयत्न सुरूअसल्याचेही म्हटले जात आहे.

LEAVE A REPLY

*