आदिकांची दुकानदारी आम्हीच बंद करू

0

भानुदास मुरकुटे यांचा इशारा

भोकर (वार्ताहर) – माझ्यावर टीका करणार्‍या अविनाश आदिक यांनी त्यांची बंद पडलेली दुकानदारी आम्ही सुरू केली ती आम्हीच बंद करू हे ध्यानात घ्यावे, असा इशारा देऊन राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे 20 वर्षे राज्याचे कॅबिनेट मंत्री होते. या 20 वर्षांत त्यांना श्रीरामपूर व राहाता तालुक्यांत उद्योगधंदे करण्यास काय अडचण होती, असा सवाल माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी केला. तालुक्यातील भोकर येथील माणिकदेव तसेच पवार-काळे अशोक बंधार्‍याचे जलपूजन श्री. मुरकुटे यांच्या हस्ते व ज्येष्ठ नेते अण्णासाहेब चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच कारखान्याचे अध्यक्ष दिगंबर शिंदे, सरपंच दत्तात्रय आहेर, सोसायटीचे अध्यक्ष राहुल अभंग, अशोकचे माजी उपाध्यक्ष माणिकराव शिंदे, बाबासाहेब काळे आदींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. त्यानंतर पंढरीनाथ मते यांच्या वस्तीवर मुख्य कार्यक्रम झाला, त्याप्रसंगी ते बोलत होते.

मुरकुटे म्हणाले, मी विरोध केल्याने श्रीरामपूरला उद्योगधंदे आले नाहीत असा आरोप विखे करतात. मी गेली 20 वर्षे आमदार नाही तर विखे मात्र 20 वर्षे कॅबिनेटमंत्री होते. मग या 20 वर्षांत विखे यांना उद्योगधंदे आणण्यास कोणी अडविले होते. विखे यांनी श्रीरामपूर तालुक्यात उठाठेव करण्याऐवजी राहाता तालुक्यात गेल्या 20 वर्षांत कोणते उद्योगधंदे आणले याचा हिशोब द्यावा. मी स्व. गोविंदराव आदिक यांची राज्याचे मंत्री असताना दुकानदारी बंद केली होती. गेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत अनुराधा आदिक यांना मानसकन्या मानून मी नगराध्यक्षपदी बसविले. नगपालिकेची सत्ता मिळाल्यावर आदिक हे अवकाळी पावसासारखे अधूनमधून येतात आणि काहीतरी बडबड करुन आणि आश्वासने देऊन मुंबईला परततात. माझ्यावर टीका करणार्‍या अविनाश आदिक यांनी त्यांची बंद पडलेली दुकानदारी आम्ही सुरू केली ती आम्हीच बंद करू हे ध्यानात घ्यावे, असे ते म्हणाले.

अशोक बंधार्‍याच्या जाळ्यामुळेच कार्यक्षेत्रात उसाची शेती वाढून उसाच्या उपलब्धतेत 12 लाख टनांपर्यंत उपलब्धता झाली. अशोक कारखाना उसाबाबत स्वावलंबी झाला असल्याचे मुरकुटे म्हणाले. याप्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष दिगंबर शिंदे, संचालक पुंजाहरी शिंदे, अशोक बँकेचे संचालक अ‍ॅड. सुभाष चौधरी आदींनी मनोगत व्यक्त केले. महेश पटारे यांनी सूत्रसंचलन केले. कार्यक्रमास अशोकचे संचालक भाऊसाहेब कहांडळ, दिगंबर तुवर, आदिनाथ झुराळे, गोरख पारखे, दत्तात्रय नाईक, अच्युत बडाख, माणिकराव पवार, भागवत पटारे, संजीवनी पतसंस्थेचे सुरेश माळवदे, उपसरपंच राजेंद्र चौधरी, सोसायटीचे उपाध्यक्ष कचरू पटारे, निवृत्ती अण्णा मते, भाऊसाहेब भोइटे, बाळासाहेब विधाटे, परशराम खंडागळे, अण्णासाहेब काळे, दत्तात्रय खेडकर, सुकदेव आबूज, वाल्मिक जाधव, लक्ष्मण सुडके, सुरेश अमोलिक आदींसह लाभधारक शेतकरी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*