भंडारदरा 20 टक्के भरले

0

मुळा पाणलोटात पावसाचा जोर ओसरला

भंडारदरा, कोतूळ (वार्ताहर) – पाणलोटात पाऊस सुरू असल्याने  भंडारदरा धरण 20 टक्के भरले आहे. गत 24 तासांत 58 दशलक्ष घनफूट पाणी दाखल झाले. सायंकाळी या धरणातील पाणीसाठा 2201 दशलक्ष घनफूट होते.
आवक झालेल्या 58 दशलक्ष घनफूट पाण्यापैकी 36 दलघफू पाण्याचा वापर झाला तर 22 दलघफू पाणी धरणात आले. काल सकाळी 905 क्युसेक्सने व्हॉल्वद्वारे पाणी सोडण्यात आले. निळवंडेतून पिण्याच्या पाण्यासाठी 1400 क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे. या धरणात 644 दलघफू पाणीसाठा आहे. दिवसभर भंडारदरा परिसरात ऊन होते. पण सायंकाळी पाच वाजेपासून रिपरिप सुरू झाली. 112 दशलक्ष घनफूट पाणीसाठा असलेल्या वाकी तलावात 42 दशलक्ष घनफूट पाणी आहे.
मुळा पाणलोटात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असून नदीतील पाणी कमी झाले आहे. या पाण्याची आवक पिंपळगाव खांड धरणात होत असून पाऊस वाढल्यास आज अथवा उद्या हे धरण ओव्हरफ्लो होऊन हे पाणी मुळा धरणाच्या दिशेने निघेल.भंडारदरा पाणलोटात पाऊस सुरू झाल्याने येथे पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. दरम्यान, येथे पर्यटकांना त्रास दिल्याप्रकरणी मनमाड येथील तरुणांचे टोळके राजूर पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

भंडारदरा पाऊस (मिमी) – भंडारदरा 14, घाटघर 20, पांजरे 03, रतनवाडी 21, वाकी 11

 

LEAVE A REPLY

*