भंडारदर्‍यात 22 दलघफू पाण्याची आवक

0
भंडारदरा (वार्ताहर) – पाणलोटात अधूनमधून होणारा पाऊस आणि घाटघर प्रकल्पाची पाणीपातळी कायम ठेवून जादा होणारे पाणी सोडण्यात येत असल्याने भंडारदरा धरणात गत बारा तासांत 22 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले असून साठा 1758 दशलक्ष फुटांवर पोहचला आहे. गतवर्षी याच काळात या धरणात केवळ 394 दलघफू पाणी होते. निळवंडेत 617 दलघफू पाणीसाठा आहे. गत 24 तासांत पडलेला पाऊस (मिमी) भंडारदरा 14, घाटघर 4, पांजरे 3, रतनवाडी 7, वाकी 2.

LEAVE A REPLY

*