भंडारदरा धरणात 65 टक्के पाणीसाठा

0

भंडारदरा (वार्ताहर) – नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा पाणलोटात अधूनमधून आषाढसरी कोसळत असल्याने भंडारदरातील साठा  65 टक्के झाला आहे. निळवंडेतही 2832 दलघफू पाणी आहे.

गत आठवडावर मान्सूनने भंडारदरा पाणलोटात मुक्काम ठोकल्याने भंडारदरा धरणात जोरदार पाण्याची आवक झाली. काहीसा पावसाचा जोर ओसरला असलातरी धरणात पाणी दाखल होत असल्याने हे धरण 65 टक्के भरण्याच्या मार्गावर आहे.

कृष्णवंती नदीही वाहती असल्याने निळवंडेतही पाणीसाठा वाढत आहे. काल सायंकाळी या धरणांतील साठा 2832 दलघफू झाला होता. कोकणकडा धुक्याने झाकाळून गेला असून जनजीवन गारठून गेले आहे. भात खाचरांमध्ये पाणी असल्याने भात आवणीला वेग आला आहे.

LEAVE A REPLY

*