भंडारदरा, निळवंडे पूर्ण क्षमतेने भरणार

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – गेल्या दोन दिवसांपासून भंडारदरा व निळवंडे पाणलोटात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे धरणात नवीन पाण्याची चांगली आवक होत आहे. त्यामुळे लवकरच भंडारदरा व निळवंडे धरण पूर्ण क्षमतेने भरणार आहे.

उत्तर जिल्ह्यासाठी वरदान असलेले ब्रिटिश कालीन 11039 दलघफू क्षमता असणारे भंडारदरा धरण सायंकाळी सहा वाजता 11000 दलघफू इतके तर प्रवरा नदीवरील 8340 दलघफू क्षमता असणारे निळवंडे धरण 7948 दलघफुटांवर पोहचले आहे. भंडारदारा व निळवंडे धरणाच्या पाणलोटात पावसाचा वेग मंदावला आहे.
त्यामुळे धरणात पाण्याची नवीन आवक मंदावलेली आहे. धरण लवकरच भरणार आहे. भंडारदरा व निळवंडे हे दोन्ही धरणे जुलै महिन्यात तांत्रिकदृष्ट्या भरली होती. भंडारदरा धरणातून 1015 क्युसेक्सने निळवंडेतून 2042 क्युसेक्स तर वाकीतून 789 ओहरप्लो सुरु आहे.

LEAVE A REPLY

*