Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

भंडारदरा पाणलोटात मृगाचा जोर वाढला

Share

भंडारदरा (वार्ताहर)- उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात दोन दिवसांच्या तुलनेत मृग नक्षत्राच्या पावसाचा काहीसा जोर वाढला आहे. त्यामुळे ओढेनाले सक्रीय होत असून धरणात अत्यल्प प्रमाणात पाण्याची आवक होऊ लागली आहे. भंडारदरा पाणलोटात दुसर्‍या दिवशी मंगळवारी सायंकाळी 5 ते 6 वेळेत मृगाच्या सरी कोसळल्या. त्यानंतर रात्री 10 वाजेपर्यंत अधूनमधून रिपरिप सुरू होती. सोमवारी झालेल्या पावसामुळे भंडारदरा धरणात प्रथमच 1 दलघफू पाणी दाखल झाले. मंगळवारी घाटघर आणि रतनवाडीत पावसाच्या सरी अधिक प्रमाणात बरसल्याने 2 दलघफू पाण्याची नव्याने आवक झाली.

त्यामुुुळे धरणातील पाणीसाठा 406 दलघफू झाला आहे. काल बुधवारी भंडारदरा परिसरात दिवसभर भुरभुर सुरू होती. वातावरणात गारवा आहे.
काल सकाळी संपलेल्या 24 तासांत पडलेला पाऊस असा (मिमी) भंडारदरा 10, घाटघर 20, पांजरे 16, रतनवाडी 23, वाकी 10. दरम्यान, धरणात सध्या पाणी नसल्याने वॉल दुरूस्ती करण्यात येत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!