Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

भंडारदरा, मुळा पाणलोटात पावसाचा जोर ओसरला

Share

भंडारदरा, कोतूळ (वार्ताहर)- भंडारदरा आणि मुळा पाणलोटात पावसाचा जोर काहीसा ओसरला असलातरी पाण्याची आवक अजूनही सुरू असल्याने प्रवरा नदी दुथडी वाहत आहे. दरम्यान, सोमवारच्या तुलनेत मंगळवारी मुळा नदीतील पाणी वाढले आहे. भंडारदरा, निळवंडे तसेच मुळा धरण तुडूंब झाली आहेत.

त्यामुळे या धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. सोमवारी रात्री निळवंडेतून सुमारे 34825 क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. ते काल सायंकाळी 5538 क्युसेकपर्यंत घटविण्यात आले. असे असलेतरी श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूरात काल दुपारी नदीतील पाणी पुलाखालून एक फूट अंतराने वाहती होती. मुळा धरणात दुपारनंतर पाण्याची आवक कमी झाल्याने 2000 क्युसेकने सोडण्यात येणारे पाणी आता 1000 क्युसेकपर्यंत घटविण्यात आले आहे.

गोदावरीत 19386 क्युसेकने पाणी
अस्तगाव वार्ताहराने कळविले की, दारणा व गंगापूर धरणांच्या पाणलोटात झालेल्या पावसामुळे पाण्याची आवक सुरूच असल्याने नांदूरमधमेश्‍वरमधून गोदावरी नदीत 19368 क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. सोमवारी हा विसर्ग 23098 दलघफू होता.

पाऊस मिमी
घाटघर- 185, रतनवाडी- 215, पांजरे- 160, भंडारदरा- 183

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!