भंडारदरा परिसरात काजव्यांचा लखलखाट

0
भंडारदरा (वार्ताहर) – भंडारदरा परीसरात सध्या काजव्यांची चंदेरी दुनिया धरतीवर अवतरली असुन संपुर्ण परीसर काजव्यांच्या लखलख दिव्यांनी उजळुन गेला आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी काजवाप्रेमी पर्यटकांची गजबज होण्यास सुरुवात झाली आहे.
भंडारदरा म्हटले की, लगेच नजरेसमोर दिसतो तो हिरव्यागार वनराईने नटलेला निसर्ग सौंदर्याचा अविष्कार, धरणाच्या भिंतीवर असणारा मनमोहक अंब्रेला फॉल, प्राचीन हेमाडपंथी अमृतेश्वर मंदिर, घाटघर चा महाकाय कोकणकडा, रंधा धबधबा, सांदन व्हॅली यांचा नावलौकिक असल्याने पर्यटकांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.
मात्र यावर देखील मात करुन अलीकडे मे महिन्याच्या अखेरीस व जुन महिन्याच्या साधारण पंधरा दिवस या कालावधीत पावसाची चाहुल लागल्यामुळ्े परीसरातील घनदाट जंगलामध्ये बेहडा, साधड्याच्या झाडांवर काजवा नावाच्या किटकांच्या दिव्यांच्या रोषणाईप्रमाणे लखलख चमकणार्‍या किटकांमुळे पर्यटकांना भुरळ घातली असुन रात्रीच्या वेळी थंडगार बोचणारी थंडी व काजव्यांनी चमकणारी चंदेरी दुनिया हा मनमोहक नजारा आपल्या नयनांत साठवण्यासाठी जंगलात झुंबड उडालेली पाहवयांस मिळत आहे.
काजवा महोत्सवा साठी मुंबई, नाशिक, पुण्याच्या पर्यटकांसोबत स्थानिकांंची गर्दी लक्ष्य वेधून घेत असते. दिवसभर आपल्या कामाच्या व्यापातुन मुक्त होवुन रात्रीच्या वेळी सहकुटुंब मनमुराद आस्वाद घेण्यासाठी येत आहे. घनदाट झाडीमध्ये लखलख चमकणार्‍या काजव्यांचे दृष्य म्हणजे निसर्गाचा अद्भुत चमत्कार अविष्कार असल्याचे पर्यटक सांगतात तर काजवे चमकण्यास सुरुवात झाली की पावसाला लवकर सुरुवात होणार असे आदिवासी बांधव म्हणतात.
काजवा महोत्सव मुळे पर्यटन व्यवसाय वाढत असल्याने परीसरातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये देखील नवचैतन्याचे वातावरण आहे. एरवी रात्रीच्या वेळी भयानक शांतता असणार्‍या परीसरांत वाहनांची वर्दळ, रेलचेल पहावयास मिळत आहे.

LEAVE A REPLY

*