भाळवणीमध्ये मतदान यंत्रात बिघाड; मतदानासाठी वेळ वाढवण्याची मागणी

0
भाळवणी (प्रतिनिधी) – पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावरील मतदान मशीन बंद पडल्याने या केंद्रावर काही वेळ अधिकार्‍यांची तारांबळ उडाली. सकाळीच मतदारांची मोठी गर्दी झाली होती. लोकसभेसाठी आज मतदान सकाळी साडेसात वाजता सुरूवात झाली आहे. परंतु सकाळी 8.30 ते 9.30 या कालावधीत मतदान मशीन बंद पडल्याने सकाळीच मतदारांची गर्दी झाली. त्यामुळे या केंद्रावर काही वेळ गोंधळ उडाला. अधिकारी लगेचच या केंद्रावर हजर झाले. सुमारे एक तासाच्या कालावधीनंतर मशीन सुरू झाल्यानंतर मतदान सुरू करण्यात आले. येथील कार्यकर्त्यांनी या बुथवरील मतदानाचा कालावधी एक तासाने वाढवून मिळावा अशी मागणी केली. त्यावर बुथ प्रमुखांनी सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान केंद्रावर जेवढे मतदार उपस्थित असतील तेवढे घेण्यात येतील असे सांगितले. त्यावर कार्यकर्त्यांनी मशीन एक तास बंद असल्याचे लेखी मागितले. त्यामुळे या केंद्रावर काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

LEAVE A REPLY

*