अहमदनगर : पारनेरचा विनायक दुधाडे भय्यूजी महाराजांचा ‘वारस’

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – अध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराजांनी सुसाईड नोटमध्ये आपल्या अनुयायाकडे सर्व व्यवहार देण्याचा उल्लेख केला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे भक्तांसोबत सर्वच आश्‍चर्यचकीत झाले आहेत. अहमदनगरकरांच्या तर भुवया आणखीच वर गेल्या आहेत. कारण महाराजांचा हा अनुयायी आहे पारनेर तालुक्यातील लोणी हवेलीचा. विनायक दुधाडे असे त्याचे नाव असल्याचे समजते.

याबाबत त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु तो होऊ शकला नाही. महाराजांच्या सुसाईड नोटमधील मजकूर पोलिसांनी जाहीर केल्यापासून माध्यमे विनायकच्या मागावर आहेत. नगर टाइम्सने त्याच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही.

दरम्यान, महाराजांनी पत्नी आणि मुलांमधील वादाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. भय्यूजी महाराजांनी काल आत्महत्या केली होती. त्यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीतील मजकुरामुळे भाविक धास्तावले आहेत. चिठ्ठीत म्हटले आहे की, माझ्या माघारी सर्व आर्थिक व्यवहार सेवक विनायकने पाहावा, असं पोलीस उपमहासंचालक हरिनारायणचारी मिश्रा यांनी सांगितलं.

भय्यू महाराज यांच्या सुसाईड नोटच्या पहिल्या पानावर आपण तणावामुळे आत्महत्या करत असल्याचं म्हटलं होतं. मात्र आता दुसर्‍या पानावर संपत्तीचा उल्लेख असल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

विनायकचे पारनेर कनेक्शन – 
विनायक हा मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील लोणी हवेलीचा आहे. त्याचे वडील व्यवसायानिमित्त मध्यप्रदेशात जात. पुढे ते महाराजांचे अनुयायी झाले. त्यामुळे त्यांची मुले विनायक आणि विजय हेही महाराजांच्या कामामुळे प्रभावित झाले. त्यांनीही भय्यूजी महाराजांना गुरू केले. त्यातील विनायक हा नेहमी भय्यू महाराजांसोबतच असे. विनायकचा शब्द हा भय्यूजी महाराजांच शब्द मानला जात. विनायक काल भय्यू महाराजांच्या मुलीला आणण्यासाठी पुण्याला गेला होता.

भय्यू महाराज यांची संपत्ती – 
भय्यू महाराजांच्या संस्थेचे राज्य सचिव उस्मानाबादचे आहेत. त्यांच्याकडून घेतलेली माहितीची अधिकृत संपत्ती याप्रमाणे – 
गेल्या काही वर्षांमध्ये भय्यू महाराजांनी एकूण मिळून 1200 एकर शेती विकली. आता भय्यू महाराजांकडे फक्त 80 एकर शेती शिल्लक आहे. खामगाव जिल्हा बुलढाणा इथली शंभर एकर शेती विकली त्यातून एक कोटी ऐंशी लाख मिळाले.
त्याआधी बार्शी टाकळी जिल्हा अकोला इथली 80 एकर शेती विकली.तुळजापूर शहरांमध्ये संभाजी महाराजांचा पुतळा बसवला. त्यासाठी पाच एकर जमीन विकून बावीस लाख रुपये दिले. सध्या सुजालपूर मध्यप्रदेश इथे 80 एकर शेती शिल्लक.
महाराष्ट्रात सध्या बुलडाण्यात पारधी समाजाच्या मुलांसाठीच्या दोन आश्रमशाळा आहेत अनुदानित इथं दीड हजार विद्यार्थी शिकतात. पुणे आणि अकोला इथे यांचाही ग्रस्त मुलांसाठी विनाअनुदानित आश्रम आहे. शाळा आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यातल्या एकतपूर इथं पाचवी ते बारावी महाविद्यालय आहे साडेतीनशे मुले शिकतात. विनाअनुदानित.
तुळजापूर तालुक्यातल्या मुरता इथं पाचवी ते बारावीच्या मुलांसाठी शाळा आहे विनाअनुदानीत साडेतीनशे मुले शिकतात. संस्थेला 80 सी मध्ये देणगी मिळाल्यानंतर कर सवलत होती. त्यातून मोठ्या प्रमाणात देणग्या येत.
अधिकृतपणे संस्थेच्या ऑडिटनुसार दरवर्षी दहा कोटी रुपयांची उलाढाल होती.

LEAVE A REPLY

*