भैरवनाथनगरची ग्रामसभा विविध विषयांनी गाजली

0

ग्रामस्थांनी ग्रामसेवक लहारे यांना धारेवर धरले

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर तालुक्यातील गोंधवणी भैरवनाथनगर येथे महात्मा गांधी जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या ग्रामसभेत विविध विषयांवर वादळी चर्चा झाली. बहुतेक ग्रामस्थांनी ग्रामसेवक श्री.लहारे यांना शौचालयाच्या अनुदानासंदर्भात धारेवर धरले.
या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच श्रीमती.विमल थोरात होत्या. प्रारंभी ग्रामसेवक निलेश लहारे यांनी मागील ग्रामसभेचे इतिवृत्त वाचून विषयपत्रिकेचे वाचन केले.
त्यानंतर खादी ग्रामोद्योगचे माजी चेअरमन प्रवीण फरगडे यांनी तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब दिघे यांनी केलेल्या चांगल्या कामाबद्दल त्यांच्या सत्काराचा ठराव मांडला.त्यास दत्तात्रय कांदे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सरपंच श्रीमती विमलताई थोरात यांचा सरपंच काळात चांगले काम केल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.
ग्रामसभेत बाळासाहेब दिघे यांनी आपल्या आक्रमक शैलीत गावठाणाबाबत तसेच विस्थापित झालेल्या लोकांच्याबाबतीत जाब विचारून विस्थापित लोकांना त्याच ठिकाणी त्याचं पुनर्वसन करावे असा ठराव मांडला. तसेच शिवरस्त्यासंदर्भात चर्चा केली.
सरस्वती इंग्लिश मीडियमचे संस्थापक विरेश लबडे यांनी रस्त्याबाबत खंत व्यक्त केली. भैरवनाथनगर ग्रामपंचायतीसाठी स्वतंत्र तलाठी कार्यालयाची मागणी करण्यात आली, अन्न सुरक्षा योजनेंतर्गत भैरवनाथनगरसाठी दोन रेशन दुकानांची मागणी करून ठराव करण्यात आला.
त्यानंतर का.तलाठी श्री.कैलास खाडे यांनी शेतकरी सन्मान योजनेसाठी कर्जमाफीसाठी भरलेल्या ऑनलाईन यादीचे वाचन केले. त्यांनतर गावातील एकही शेतकरी कर्ज माफीपासून वंचित राहू नये असा ठराव बाळासाहेब दिघे यांनी मांडला त्यास अनुमोदन मधुकर लबडे व शंकर लबडे यांनी दिले.
ग्रामसभेस सरपंच श्रीमती विमलताई थोरात, ग्रामसेवक श्री.निलेश लहारे, तंटामुक्तीचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब दिघे, खादी ग्रामोद्योगचे चेअरमन प्रवीण फरगडे, पोलीस पाटील स्वप्नील शिंदे, सौ. शिंदे, सौ.शिरसाठ, सौ.दीपाली फरगडे, सौ.वैशाली फरगडे, सौ. पठारे, सुनील शिंदे, बापूसाहेब लबडे, भूषण दिघे, शंकर लबडे, मधुकर लबडे, सिद्धार्थ सोनवणे, सुखदेव देवकर,
आबासाहेब सोनवणे, पुंजा सोनवणे , वसंत देवकर,अमोल गवारे, शकील शेख , अमोल काळे, कृष्णा वाकचौरे , सौरभ गवारे, श्रीराम फरगडे, बंडू करंडे, प्रल्हाद कांदे ,गोविंद कांदे, संदीप पवार,किरण चोतमल, सोमनाथ देशपाडे, फिरोज शेख, दिगंबर फरगडे, मनोहर गवारे,
दत्तात्रय कांदे, बाळासाहेब लबडे, देवका देवकर, शांताराम शेळके, रवी जाधव, अशोक जाधव, विलास म्हस्के, प्रभाकर लबडे , सोन्याबापू लबडे, आबा देवकर , दौलतखान पठाण, धर्मा लबडे, सतीश लबडे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.

  लालबहादूर शास्त्री यांची प्रतिमाच ग्रामपंचायतीत नाही; निषेध  –  प्रारंभी ग्रामसभा सुरु होतेवेळी विरोधी सदस्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे प्रतिमेचे पूजन होऊनही गांधीजींची प्रतिमा हलवून दुसर्‍या ठिकाणी नेवुन वेगळी चूल मांडून तेथे ग्रामसभा घेण्याचा प्रयत्न केला. परंतु बहुसंख्य ग्रामस्थ त्याच जागेवर ठाण मांडले. त्यामुळे बाळासाहेब दिघे यांनी निषेध व्यक्त करून लालबहाद्दूर शास्त्री यांची प्रतिमा ग्रामपंचायतीस दहा वर्षे होऊनही नसल्याने खंत व्यक्त केली.

LEAVE A REPLY

*