Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून भगतसिंह कोश्‍यारी यांची नियुक्ती

Share

मुंबई : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पाच राज्यांच्या राज्यपालांची नियुक्‍ती केली आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालपदी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंह कोश्‍यारी यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. राज्यपाल सी.विद्यासागर राव यांचा कार्यकाल ३० ऑगस्ट रोजी संपल्याने कोश्‍यारी यांची या पदावर नियुक्‍ती करण्यात आली आहे.

भगत सिंह कोश्यारी उत्तराखंडचे दिग्गज भाजप नेते आहेत. त्यांचा जन्म १७ जून १९४२ रोजी झाला होता. उत्तराखंड राज्याची निर्मिती झाली तेव्हा ते भाजपचे पहिले प्रदेशाध्यक्ष बनले. २००१ ते २००७ या कालावधीत ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. २००२ ते २००७ पर्यंत त्यांनी विरोधी पक्ष नेते म्हणूनही काम पाहिले.

२००८ ते २०१४ पर्यंत ते राज्यसभेत खासदार होते. त्यांनी इंग्रजी साहित्यातून पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. ते शिक्षक आणि पत्रकारही होते. १९७५ मध्ये पिथोरागडहून प्रकाशित होणाऱ्या ‘पर्वत पीयूष’ साप्ताहिकाचे ते संस्थापक तसेच प्रबंध संपादक होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!