Type to search

maharashtra जळगाव मुख्य बातम्या

भडगावात खुन झालेल्या त्या बालकाच्या वडील, आई व बहीणीने गळफास घेऊन तिघांनी संपविली जीवनयात्रा

Share
भडगाव । खुन झालेल्या त्या बालकाच्या वडील, आई व बहीणीने गळफास घेऊन घरात आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी वेगाने चक्रे फीरवली आहेत.

बब्बु सैय्यद रा.फतेहपुर (उत्तरप्रदेश, ह.मु.टोणगाव) हे भडगावात बांगडी बनविण्याचा व्यवसाय करत होते. 21 मार्च रोजी दुपारी चार वाजता त्याचा इसम सय्यद हा तिसरीत शिकणारा मुलगा गायब झाला होता. त्यानंतर दुसर्या दिवशी 22 मार्च ला दुपारी चार वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह पाचोरा रस्त्यावरील र.ना.देशमुख महाविद्यालयाच्या शेजारील केळीच्या शेतात आढळून आला होता. त्या बालकाच्या खुनाचा पोलिसांकडुन तपास सुरू होता. आज अचानक सकाळी सव्वा दहा वाजेच्या बालकाचे वडील वडील बब्बु लल्लन सय्यद (वय 48)आई पिंकी बब्बु सय्यद (वय 38) , बहीण नेहा (वय 16) यांनी घरातच गळफास घेऊन सामुहीक आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. त्यांनी उशिरापर्यंत दरवाजा न उघडल्याने हा प्रकार उघड झाला. या तिहेरी आत्महत्येने शहरात खळबळ उडाली आहे.

बब्बु सय्यद याने सकाळी नमाज पठण केल्यानंतर घराच्या छताला असलेल्या खिडकीला दोरखंड बांधून तिघांनी गळफास घेतला आहे. घराचा दरवाजा आतुन बंद करण्यात आला होता. उशीरापर्यंत घराचा दरवाजा बंदच असल्याने घर मालक इलीयास बेग मिर्झा यांनी आवाज दिला. मात्र त्यांच्याकडुन प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी छतावरून घरात ढुकुंन पाहीले असता त्यांना त्यांनी फाशी घेतल्याचे आढळून आले. त्यांनी तत्काळ पोलिस स्टेशनला याबाबत माहीती दिली. पोलिस निरीक्षक धनंजय येरूळे हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तर त्यानंतर पोलिस अधिक्षक पंजाबराव उगले, अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव, चाळीसगाव पोलिस उपविभागीय अधिकारी नजीर शेख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रोहम यांनी घटनास्थळी भेट दिली. सर्व अधिकारी भडगावात ठाण मांडुन होते. दरम्यान घटनास्थळी सुसाईड नोट सापडल्याचे बोलले जात आहे. त्यातुन आत्महत्येचे व खुनाचा उलगडा होण्याची शक्यता आहे. तिघांनी आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप समजुन आलेले नाही. मात्र पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फीरविण्यात आले आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!