पाकिटमारांनी दशक्रिया विधीतही मारला हात

0
टाकळीभान (वार्ताहर) – एसटी स्टँड, आठवडे बाजार किंवा गर्दीच्या ठिकाणी खिशातील पाकिटावर हात मारणारे पाकिटमार आता दुःखाच्या दशक्रिया विधीसारख्या कार्यक्रमातही हाथ की सफाई दाखवू लागल्याने नागरिकांमध्ये प्रचंड चीड निर्माण होताना दिसत आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे काल गुरुवारी सकाळी नानासाहेब रामचंद्र कोकणे यांच्या दशक्रियाविधीचा कार्यक्रम येथील महादेव मंदिराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर राहिल्याने कार्यक्रमाला गर्दी झाली होती.
पिंडदान झाल्यानंतर तीळ घेण्यासाठी उपस्थितांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली. याच गर्दीचा फायदा घेत पाकिटमारांनी चांगलाच हात साफ केला. श्रीरामपूर येथील औषध विक्रेते कारभारी कान्हे, त्रिमूर्ती संकुलाचे साहेबराव घाडगे, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष कृष्णा वेताळ, बाळासाहेब टेकाळे, गोविंद पवार, पिंटू शेळके व आणखी काहींचे पाकिटे मारुन सुमारे 50 ते 60 हजार रुपयाची लंपास केले आहेत.
महिनाभरापूर्वी कै. जगन्नाथ लोखंडे यांच्या दशक्रियाविधीत ग्रामविकास अधिकारी रामदास जाधव यांचे दहा हजाराचे पाकिट याच ठिकाणी मारले गेले होते. येथील दशक्रियाविधीच्या ठिकाणी पाकिटमारी होण्याची ही गेल्या कित्येक वर्षातली दुसरी घटना आाहे. पाकिटमारांनी आपले कार्यक्षेत्र दुःखाच्या कार्यक्रमातही वाढविल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

*