Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या

मुंबई : आजपासून  बेस्टचे नवे तिकीटदर लागू; ५० लाख प्रवाशांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट 

Share

मुंबई  | वृत्तसंस्था

आजपासून बेस्टच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी मिळणार आहे. मुंबई पालिकेने दिलेल्या आर्थिक निधीमुळे बेस्टचे नवे तिकीटदर आजपासून लागू करण्यात आले आहेत.

आता बेस्टमधून प्रवास करताना प्रवाशांना किमान प्रवासासाठी फक्त पाच रुपये भाडे आकारले जाणार आहे. पुढे प्रत्येक पाच किमी प्रवासाला पाच रुपये वाढ होणार आहे.

तर भविष्यात दाखल होणाऱ्या एसी बसच्या किमान प्रवासासाठी सहा रुपये मोजावे लागतील.  बेस्टची प्रवासी संख्या सध्या प्रतिदिन २५ ते ३० लाखांपर्यंत कमी झाली असून  ही संख्या ५० लाखांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

यासाठी बेस्टने बसच्या ताफ्यात वाढ करण्याच्या निर्णयासह तिकीट दरकपातीचा महत्त्वाचा निर्णयदेखील घेतला आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!