Type to search

क्रीडा

सलग दुसऱ्या विजयासाठी टीम इंडिया सज्ज

Share

बंगळूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघांमध्ये सध्या ३ टी २० सामन्यांची मालिका सुरु असून, धरमशाला येथील पहिला सामना पावसाच्या व्यत्ययाने रद्द झाल्यानंतर मोहाली लढतीत आफ्रिकेवर ७ विकेट्सने दणदणीत विजय साजरा केला. आता रविवारी २२ सप्टेंबर २०१९ रोजी बंगळूरच्या एम चिन्नस्वामी मैदानावर मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना खेळवण्यात येणार आहे.

सामन्याचे थेट प्रक्षेपण सायंकाळी ७ वाजता स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टारवर करण्यात येणार आहे. भारतीय संघाने या मालिकेत १-० अशी विजयी आघाडी घेतली असून, आता रविवारचा सामना जिंकून मालिका २-० ने जिंकण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न आहे. तर दुसरीकडे आफ्रिका मालिका १-१ ने बरोबरीत राखण्यासाठी सज्ज आहे.

भारतीय संघाच्या फलंदाजीची मदार धवन, रोहित, विराट, राहुल, मनीष पांडे, श्रेयस अय्यर यांच्यावर आहे. अष्टपैलूंमध्ये कृणाल पंड्या, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, आणि वॉशिंग्टन सुंदर आहेत. गोलंदाजीत दीपक चाहर, नवदीप सेनी, राहुल चाहर खलील अहमद आहेत.

आफ्रिकेच्या फलंदाजीची भिस्त क्विंटन डिकॉक, रुसी वेन्डर डू सेन, बेअरन हेन्ड्रिक्स, रिझा हेन्ड्रिक्स, डेविड मिलर यांच्यावर आहे. अष्टपैलूंमध्ये आंद्रे पीटलूकवयो, अँड्रीच नॉर्टीजे आणि द्वेन प्रिटोरियस आहेत. गोलंदाजीत कांगिसो रबाडा, तेवेज शम्सी फॉरचून हे पर्याय आहेत. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली या मैदानावरील प्रेक्षकांचा लोकप्रिय खेळाडू असल्यामुळे त्याच्याकडून मोठी खेळी संघाला अपेक्षित आहे.

शिवाय संघाला चिंता आहे ती रोहित आणि पंतच्या खराब फॉर्मची मोहाली लढतीत तांबडतोड ४० धावा ठोकून गब्बरने आपल्याला लय परत मिळाली असल्याचे दाखवून दिले आहे. त्याला फक्त आपल्या कामगिरीत सातत्य राखण्याची आवश्यकता आहे. हे मैदान आकाराने लहान असल्यामुळे येथे धावांचा पाऊस मोट्या प्रमाणात पडण्याची शक्यता आहे. हे मैदान आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि रणजी संघ कर्नाटकचे घरचे मैदान आहे. या मैदानावर एकूण ४० हजार प्रेक्षक बसू शकतात.

एंड्स पॅव्हेलियन एन्ड आणि बीएएलएम एन्ड पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १६८ नीचांकी धावसंख्या श्रीलंका १२२-९ २० मार्च २०१६ या मैदानावर पहिला आंतरराष्ट्रीय टी २० सामना भारत विरुद्ध पाकिस्तान डिसेंबर २०१२ या मैदानावरील सर्वात मोठा विजय भारत ७५ धावांनी विरुद्ध इंग्लंड १ फेब्रुवारी २०१७ निसटता विजय १ रन भारत विरुद्ध बांगलादेश मार्च २०१६ सर्वाधिक बळी भुवनेश्वर कुमार ४ षटके ९ धावा ३ विकेट्स शिवाय विराट कोहलीने आता टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या टी २० सामन्यात केलेल्या ७२ धावांच्या खेळीमुळे तो आता सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. या आधी हा विक्रम रोहित शर्माच्या नावावर होतानारायण राजू हे या मैदानाचे पीच क्युरेटर आहेत. हे मैदान धावांचा पाठलाग करण्यासाठी अनुकूल असल्यामुळे नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम क्षेत्रक्षणाला प्राधान्य देईल यात शंका नाही.

हवामान :विखुरलेले वादळ असण्याची शक्यता
आमनेसामने १४ ९ विजयी भारत ५ विजयी आफ्रिका

दक्षिण आफ्रिका : क्विंटन डिकॉक , टेम्बा बाऊमा , रुसी वेन्डर डू सेन , बेऊर्न हेन्ड्रिक्स , रिझा हेन्ड्रिक्स , डेविड मिलर , आंद्रे पीटलूकवयो, डेन प्रिटोरियस, अँड्रीच नॉर्टीजे, तेवज शम्सी, कांगिसो रबाडा जॉर्ज लिंडे, जुनिअर दला आणि बिजोन फोर्तुन.

भारत : रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, लोकेश राहुल, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, कृणाल पंड्या, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चाहर, दीपक चाहर, नवदीप सेनी, खलील अहमद.

सलिल परांजपे देशदूत नाशिक

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!