#BeingHuman : ‘बिइंग ह्युमन’ ची ‘ई- सायकल’ लवकरच बाजारात

0

अभिनेता सलमान खान आणि त्याच्या ‘बिइंग ह्युमन’ या संस्थेतर्फे ई- सायकलचं अनावरण करण्यात आलं.

बॅटरीवर चालणाऱ्या या सायकल लाँच सोहळ्यावेळी संपूर्ण खान कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

यावेळी सलमानची बहिण अर्पिता आणि तिचा मुलगा अहिल विशेष आकर्षणाचा विषय ठरले.

प्रसारमाध्यमांच्या गर्दीत या सायकलचं अनावरण करण्यात आलं. यावेळी सलमानने त्याच्या बालपणीच्या काही आठवणीही जाग्या केल्या.

वडिलांची फारशी आवक नसतानाही त्याला महागातली सायकल घेऊन देत आपल्या मुलाचा हट्ट त्यांनी कशाप्रकारे पुरवला होता याची आठवण दबंग अभिनेत्याने सांगितली.

दरम्यान, सोशल मीडियावरही भाईजानच्या या ई- सायकलच्याच चर्चा पाहायला मिळाल्या.

४०,००० रुपयांच्या बेस मॉडलमध्ये उपलब्ध असलेली ही ई- सायकल सध्या अनेकांसाठी कुतूहलाचा विषयही ठरत आहे.

या सायकलचं टॉप मॉडल ५७,००० रुपयांना उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY

*