कंपनीत मुलाखतीसाठी जाताय…मग हे वाचाच

0
अनेक क्षेत्रात नोकरीच्या चांगल्या उपलब्ध आहेत. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यादेखील कार्यक्षेत्र वाढवण्यावर भर देत आहेत. त्यामुळे रोजगार उपलब्ध होण्यास मदत होतांना दिसून येत आहे.
बहुराष्ट्रीय कंपन्या किंवा कोणत्याही कंपन्यांमध्ये अनेक विद्यार्थी मुलाखतीत अपयशी ठरतात. मुलाखतीत यशस्वी होण्यासाठी काही मंत्र, तंत्र आपण अभ्यासने फार महत्वाचे आहे.
नोकरी संपादन करण्याच्या प्रक्रियेत मुलाखतीला सामोरे जातांना काही पथ्ये पाळावी लागतात.   मुलाखतीला सामोरे जातांना  उत्तम आत्मविश्वास असावा लागतो.
आपण कोणकोणत्या विषयात आणि कौशल्यांमध्ये पारंगत आहोत, हे मुलाखतकर्त्याला व्यवस्थित सांगणे  आवश्यक असते. उमेदवाराने कंपनीत  ज्या कामासाठी अर्ज केला आहे, त्या क्षेत्रात आपण कसे योग्य आहोत हे पटवून दिले पाहिजे.
विचारलेल्या प्रश्नांचे उत्तरे किती शांतपणे आणि विचारपुर्वक द्यावीत. एकंदरीतच उमेदवाराचा स्वभाव आणि वागणूक   यांचे निरिक्षण मुलाखत घेणारा करत असतो.
चांगला उमेदवार निवडण्याची जबाबदारी मुलाखतकर्त्यावर असते. सदर जागेकरिता ‘मी कसा योग्य आणि उपयुक्त आहे’ हे मुलाखत देणाऱ्याने मुलाखतकर्त्याला दखावून द्यायचे असते.
स्पर्धात्मक युगात इतरांपेक्षा सरस ठरण्याकरिता स्वतःचे वेगळेपण आणि विशिष्ट चमक दिसणे अत्यंत महत्त्वाचे आहे.व्यावसायिक मुलाखतीत  बोलण्याची पद्धत, शिष्टाचार, निटनेटकेपणा  यांना विशेष महत्व असते  हे लक्षात ठेवा .
एखादा प्रश्‍न समजला नाही तर  प्रश्‍न पुन्हा सांगण्याबाबत विनंती करावी. ‘पॉझिटिव्ह थिंकिंग’ हा दृष्टिकोन ठेवावा.

मुलाखतीला जाताना पुढील नियम पाळायलाच हवेत

कंपनीचा अभ्यास : ज्या कंपनीत नोकरीकरिता अर्ज केला आहे तिच्याबद्दल मिळेल ती सर्व माहिती गोळा करा.  कंपनी करत असलेली कामे, सेवा  तेथील प्रमुख कर्मचारी इत्यादींचा अभ्यास करा. सद्यस्थितीत कंपनीत काय चालू आहे हे कंपनीच्या संकेतस्थळावरून माहित करून घ्या.
कौशल्य अद्ययावत ठेवा : संकेतस्थळावरून  कंपनीची उत्पादने, सेवा, काम  आणि कामासाठी लागणारे कौशल्य  यांची माहिती मिळवा व लागणारे कौशल्य अवगत करूनच मुलाखतीला सामोरे जा.
कंपनीच्या गरजेनुसार  आपला बायोडाटा तयार करा : . मुलाखत घेणाऱ्याकडे तुमचा जुना रेस्युम असू शकतो. हा रेस्युम कंपनीच्या गरजेनुसार बनवलेला असावा. त्यातून तुम्ही त्या पदासाठी कसे योग्य उमेदवार आहात हे दिसून आले पाहिजे.  उमेद्वाराबद्दलचे ‘इम्प्रेशन’  आपला बायोडाटाच निर्माण करत असतो म्हणून त्यावर अधिक लक्ष देऊन काम करावे.
* चेहऱ्यावर प्रसन्नता असू द्या. हसरा चेहरा  ठेवावा
*पोषाखाची निवड:योग्य व्यावसायीक पेहराव उठाव देणारा असावा.
* उत्तम आत्मविश्वास ठेवा
* मुलाखतीच्या ठिकाणी गोंधळून जाऊ नका शांततेने विचार करून प्रश्नांची उत्तरे द्या
* अवगत कौशल्यांबाबत उदाहरनां सह सविस्तर माहिती द्यावी  .
*मुलाखती नंतर मुलाखत देण्याची संधी दिल्याबद्दल मुलाखतकर्त्याचे  आभार माना
  मुलाखतीच्यावेळी कुठल्या  चुका होतात  आणि त्या टाळण्याचे उपाय काय ? 
उशीरा पोहोचणे : मुलाखतीला जाताना वेळेचे नियोजन करून  घरातुन बाहेर पडा. तरीही काही अपरिहार्य गोष्टी घडल्यास फोनवरून तशी माहिती देऊन नंतरची वेळ ठरवुन घ्या.
गोंधळून जाऊ नका  :  चेहेऱ्यावर मात्र मंद स्मितच असु द्या. समोरील आत्मविश्वासाने प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून उत्तरे द्यायला सुरुवात करा.
तुमच्या  दुर्बलतांचे प्रदर्शन करू नका:  बलस्थाने  नजरेत येतील हे पहा आणि त्याच वेळेस दुर्बलतांना सकारात्मक वळण देण्याचा प्रयत्न करा.
अतिबोलणे टाळावे  :  प्रश्नांची उत्तरे नेहेमी समर्पक शब्दात, थोडक्यात द्यावीत .
पगार आणि इतर लाभाची  विचारणा स्वतः:  करू नका : समोरील मुलाखतकर्ता ते सांगणारच असतो. त्याला ते सांगण्याकरिता थोडा वेळ द्या.
लेखक : प्रा योगेश  हांडगे.

LEAVE A REPLY

*