Photogallery : नगर-जामखेड रस्त्यावरील आष्टीजवळ धानोरा घाटात खासगी बसचा भीषण अपघात, 9 जणांचा मृत्यू

0

अहमदनगर : बीड जिल्ह्यातील कडा तालुक्यात धानोर्‍याजवळ खासगी बसच्या भीषण अपघातात 9 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

अपघातात 26 प्रवाशी जखमी झाले आहेत.

अहमदनगर – जामखेड रस्त्यावरील आष्टीजवळ धानोरा घाटात आज (रविवारी) सकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

दुर्घटनाग्रस्त बस मुंबईहून लातूरकडे जात होती. सागर ट्रॅव्हल्सची ही बस आहे.
अंभोरा पोलिस स्टेशनचे उपपोलिस निरीक्षक महेश टाक यांनी सांगितले की, सागर ट्रॅव्हलची बस पहाटे मुंबईहून लातूरकडे येत होती.

बालेवाडी फाट्याकडून पुढे आल्यावर घाटातील पहिल्याच वळनाला चालकाचा बसवरील ताबा सुटला. बस 100 फूट खड्ड्यात कोसळली.

या अपघातात 9 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर 26 प्रवाशी जखमी झाले आहे.

मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. गंभीर जखमींना अहमदनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. मृतदेह कडा व आष्टी येथील रुग्णालयात आणण्यात आले.

मृतांमध्ये आष्टी तालुक्यातील एकाचा समावेश असून उर्वरित केज, अंबाजोगाई, लातूर भागातील असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

*