Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

तुम्ही ३०० जागा दिल्या मोदींनी ३७० कलम हटवले – अमित शाह

Share

बीड | वृत्तसंस्था 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काश्मीरमधील कलम 370 रद्द करून देशाला एक केले. जनतेने ३०० जागा दिल्या मोदींनी ३७० रद्द करून देश अखंड ठेवला. अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मोदी सरकारच्या वाटचालीचे कौतुक केले. शाह यांच्या उपस्थितीत बीड जिल्ह्यातील सावरगावात दसरा मेळाव्यातून पंकजा मुंडे यांनी शक्तिप्रदर्शन केले.

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आज दसऱ्या निमित्ताने अनेक राजकीय पक्षांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. दसऱ्याच्या निमित्ताने बीड येथील दसरा मेळाव्याला भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आले आहेत.

यावेळी पाटोदा तालुक्यातील संत भगवान बाबा यांचे जन्मस्थळ सावरगावच्या भगवान भक्तिगडावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुंडे समर्थकांकडून केंद्रीय गृहमंत्र्यांचे स्वागत 370 राष्ट्रध्वज दाखवून करण्यात आले.

आपल्या भाषणादरम्यान शहांनी वेळोवेळी ‘भारत माता की जय’ आणि ‘भगवान बाबा की जय’ अशा घोषणा दिल्या. “आज सर्वांना आनंद झाला आहे. 2014 मध्ये अमित शाह हे भगवान बाबांच्या दर्शनासाठी आले होते. त्यानंतर आपल्याला खरं आपलं सरकार लाभलं असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या.

आज एवढा  प्रचंड जनसमुदाय याठिकाणी जमला आहे. कार्यकर्त्यांना याठिकाणी बसायलाही जागा मिळत नाहीये. अजूनही याठिकाणी कार्यकर्त्यांचा ओघ सुरूच आहे भविष्यातही हे असंच चालू राहणार असलायचे म्हणत पंकज मुंडे यांनी सभेला संबोधित केले.

जनतेने मोदी सरकारला दिलेला कौल पुन्हा एकदा सार्थ करून दाखवला आहे. जनतेने भाजपला केंद्रात सत्ता देत ३०० जागा दिल्या. मोदींनी काश्मीरमधील ३७० कलम हटवत भारत अखंड ठेवला असल्याचे शाह म्हणाले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!