महिलेने विमानातच दिला बाळाला जन्म

0
जेट एअरवेजच्या विमानात एका प्रवासी महिलेने विमानातच बाळाला जन्म दिला. ही महिला दमन ते कोची असा प्रवास करत होती.

या महिलेला प्रसूतीच्या वेदना होऊ लागताच विमानातील कर्मचाऱ्यांनी इमर्जन्सी घोषित करत विमान तातडीने जवळच्या म्हणजेच मुंबई विमानतळाकडे वळवले.

विमानात कोणी डॉक्टर नसल्यामुळे कर्मचाऱ्याची चांगलीच धावपळ उडाली होती. मात्र एक नर्स याच विमानातून प्रवास करत होती ती नर्स या महिलेच्या मदतीला धावून आली.

त्यानंतर महीलेची विमानातच प्रसूती पार पडली. या महिलेने विमानातच बाळाला जन्म दिला. दरम्यान, आई व तिचे बाळ सुखरूप असल्याचे विमान कर्मचारी म्हणाले.

त्यानंतर या विमानाने कोचीकडे उड्डाण केले.

LEAVE A REPLY

*