महेंद्रसिंग धोनीला बीसीसीआयच्या वार्षिक करारातून वगळले

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई | प्रतिनिधी 

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ने वार्षिक करारातून वगळले आहे. धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून बऱ्याच दिवसांपासून दूर आहे.

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनी एकही सामना खेळलेला नाही. तसेच संधी न मिळालेल्या धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांनादेखील उधान आले होते.

बीसीसीआयने आज ऑक्टोबर 2019 ते सप्टेंबर 2020 या कालावधीसाठी वार्षिक करारातील खेळाडूंची नावे जाहीर केली. त्यात धोनीचे नाव वगळल्याचे निदर्शनास आले आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या करारात मयांक अग्रवाल, नवदीप सैनी, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर आणि दीपक चहर यांना करार देण्यात आले आहे.

या करारानुसार ए+ ग्रेडमध्ये असलेल्या खेळाडूंना 7 कोटी रुपये मानधन मिळणार आहे. तर ए ग्रेड असलेल्या खेळाडूंना 5 कोटी, बी ग्रेड – 3 कोटी व सी ग्रेडमध्ये असलेल्या खेळाडूंना 1 कोटी रुपये मानधन दिले जाणार आहे.

यात ए प्लस ग्रेडमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह हे आहेत. ए ग्रेडमध्ये रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, भुवनेस्वर कुमार, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, शिखर धवन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, कुलदीप यादव, रिषभ पंत.  बी ग्रेडमध्ये वृद्धीमान साहा, उमेश यादव, युजवेंद्र चहल, हार्दिक पांड्या, मयांक अग्रवाल यांचा समावेश आहे.

सी ग्रेडमध्ये केदार जाधव, नवदीप सैनी, दीपक चहर, मनिष पांडे, हनुमा विहारी, शार्दूल ठाकूर, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर आहेत. एकूणच या नावांमध्ये लोकेश राहुलला बी गटातून अ गटात बढती मिळाली आहे तर वृद्धीमान साहाही सी गटातून बी गटात गेला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *