‘सीआयआय’ची सिमेन्स येथे बायर-सेलर मीट

0
सातपूर : सीआयआयच्या वतीने सिमेन्स कंपनीसाठी बायर सेलर मीटचे आयोजन करण्यात आले होते. त्यामाध्यमातून नाशिकच्या लघु व मध्यम उद्योगांना नव्या संधीचा लाभ घेणे शक्य होणार आहे. काल या मीटचा शुभारंभ सीआयआयचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चिंतावर यांच्या हस्ते करण्यात आला.

नाशिकच्या लघु व मध्यम उद्योगांमध्ये गुणवत्ता ही आंतरराष्ट्रीय स्तरावरची आहे. अनेक विदेशी कंपन्या नाशिकच्या
उत्पादनांना गुणवत्तेमुळे पहिली पसंती देत आहेत. सुरक्षा विभागासोबत मद्यंतरी घेतलेल्या मीटमध्ये उद्योगांना चांगल्या संधीही प्राप्त झालेल्या आहे. त्यामुळे येणार्‍या काळात नाशिक हे जागतिक स्थरावरील उत्कृष्ट उत्पादक स्थानाचा लौकिक मिळवेल असा विश्वास बॉशचे उपाध्यक्ष तसेच सीआयआयचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चिंतावार यांनी केले.

सीआयआयच्या वतीने सिमेन्स कंपनीसाठी बायर सेलर मीटचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री चिंतावर बोलत होते. यावेळी व्यासपिठावर सिमेन्सचे नाशिक प्रमुख दिपक कुलकर्णी, सप्लाय चेनचे महाव्यवस्थापक बसवराज बिरादर, सीआयआयचे निर्यात व मार्केटींगचे समन्वयक मुकेश गुप्ता होते.

यावेळी बोलताना कुलकर्णी यांनी बाजारपेठेतील मंदीच्या पार्श्वभूमीवर उत्पादन मुल्य कमी करण्याच्या दृष्टीने उपाय योजना करण्याचा हा भाग असून नवीन पुरवठादारांशी संबंध प्रस्तापित करताना सिमेन्सच्या मुख्य धारेत येणार्‍यांची इनेव्हेशन, एक्सलन्स व रिस्पॉन्सिबल या तत्वांच्या कसोटीवर तपासणी केली जाणार आहे. यातून उत्कृष्ट सेवा देणार्‍यांना जागतिक स्तरावरुनही संधी उपलब्ध होण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखवली.

या उपक्रमात 40 आस्थापनांचे 60 प्रतिनिधींनी सहभागी झाले. पुरवठादारांना संबोधन करताना सप्लाय चेनचे महाव्यवस्थापक बिरादर यांनी सिमेन्स मध्ये ‘म्युच्यूअल बेनिफीट रिलेशन्स’ प्रस्तापित केले जाते. आपल्या कार्यक्षेत्रातील उत्पादन निवडून उद्योगांनी क्षमतांची आढावा द्यावा. त्यांनी नाशिकच नव्हे तर सिमेन्सच्या देशभरातील कोणत्याही ठिकाणी पुरवठादार बनण्याचे आवाहन केले.

LEAVE A REPLY

*