Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच मार्केट बझ मुख्य बातम्या

जयपूरच्या ‘BattRE’ कंपनीची ‘ई-स्कूटर’ लॉन्च; पाच रंगात उपलब्ध

Share

नवी दिल्ली | प्रतिनिधी 

इलेक्ट्रिक वाहनांना सरकारकडून हिरवा कंदील देण्यात आल्यानंतर सर्वत्र ही वाहणं वाढली आहेत. सध्याचा काळ हा पर्यावरणाचे संरक्षण करणारा आहे, याबाबत जनजागृती होते आहे. यातून अनेकजण पेट्रोल डीझेलची वाहने सोडून इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देत आहेत.

या सर्व गोष्टींचा अभ्यास करून काळानुसार दिग्गज ऑटो कंपन्या स्वतःमध्ये बदल करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. यामध्ये अनेक नवीन कंपन्यांचा उदय झाला असून लवकरच इलेक्ट्रिकल वाहनांची स्पर्धा बघायला मिळणार आहे.

नुकतीच जयपूर येथील स्टार्टअप कंपनी BattRE ने नवीकोरी इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. या स्कूटरची किंमत  63 हजार 555 रुपये आहे.

एकदा का ही स्कृटर फुल चार्जिंग केली तर 90 किलोमीटर पर्यंत अंतर जाऊ शकते असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. BattRE ने ही इलेक्ट्रिक स्कूटर पाच रंगांमध्ये उपलब्ध करून दिली आहे.

स्कूटरच्या फ्रंट साईडला एलईडी हेडलाइट देण्यात  आले आहे. यामध्ये इंडिकेटर्स आणि मुख्य लाईटदेखील एलईडी आहे. राउंड हेडलैम्प आणि रियर व्यू मिरर्स स्कूटरला रेट्रोसारखा लुक देतात.

यासोबतच स्कूटरमध्ये हैंडलबारवर ब्लैक फ्लाय स्क्रीन, डिजिटल इंस्ट्रूमेंट कंसोल, कीलेस इग्निशन, एंटी थेफ्ट अलार्म सिस्टम आणि  यूएसबी चार्जरची सोय करून देण्यात आली आहे.

सर्वात हलके वाहन 

BattRE च्या या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 48V 30 Ah लिथियम आयन बैटरी देण्यात आली आहे. एकदा पूर्ण चार्जिंग केल्यानंतर हे वाहन ९० किमी धावू शकते. बैटरीचे वजन 12 किलोग्राम आहे. तर स्कूटरचे एकूण वजन 64 किलोग्राम आहे.

चार्जिंग झाल्यानंतर अपोआप कनेक्शन बंद होते

चार्जिंगला लावलेली स्कूटर चार्जिंग झाल्यावर अपोआप वीज कनेक्शन काढण्याचे संकेत देते. या स्कूटरचे अद्याप नामकरण करण्यात आले नाही. मात्र ई-स्कूटर असे या स्कूटरला म्हटले जात आहे. सध्या ही स्कूटर फक्त नागपुर, हैदराबाद, अनंतपुर आणि  कुरनूल याठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जूनअखेरपर्यंत पुणे, विजाग आणि वारंगलमध्ये डीलर्सशिप आणि सर्व्हिस सेंटर उघडण्यात येणार आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!