अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धा : बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर; नगरच्या गायकवाडचा एसपींच्या हस्ते सन्मान

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – झारखंड येथे नुकतीच 66 वी अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धा पार पडली. यामध्ये बास्केटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने चौथा क्रमांक मिळविला आहे. या स्पर्धेमध्ये नगरच्या कपिल गायकवाड या खेळाडूने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्या कामगिरीबद्दल त्यांचे सर्वच स्तरांतून अभिनंदन होत आहे.
66 वी अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धा झारखंड येथे पार पडली. यामध्ये झालेल्या बॉस्केटबॉल स्पर्धेत देशभरातील एकूण 32 संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील संघाने सहभाग घेतला होता. या संघामध्ये शशांक कदम, अनिल वटकर, महांतेश अनंत काळे, किरण पवार, युवराज शैमढे या खेळाडूंची संघात वर्णी लागली होती.
या खेळाडूंबरोबरच नाशिक परिक्षेत्रातून बेलवंडी पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेले कपिल गायकवाड या एकमेव खेळाडूची संघात निवड झाली होती. या खेळाडूने आपली निवड सार्थ ठरवली आहे. राज्याच्या संघामध्ये उल्लेखनीय कमगिरी करून संघाला चौथ्या क्रमांकाचे बक्षीस मिळवून दिले आहे.
गायकवाड यांनी झारखंडमध्ये झालेल्या बॉस्केट बॉल स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी राखीव पोलीस दलाचे पोलीस निरीक्षक दशरथ हटकर, गायकवाड यांचे मार्गदर्शक विकी जोशप आदी उपस्थित होते.
गायवाड यांचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील, सहायक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, पोलीस उपअधीक्षक आनंद भोइटे, गृह पोलीस उपअधीक्षक जगताप, राखीव पोलीस दलाचे पोलीस निरीक्षक दशरथ शिंदे, बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुगळे, मार्गदर्शक विकी जोशप यांच्यासह अधिकारी व कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले आहे.

लहानपणापासूनच बास्केटबॉल खेळण्याची आवड आहे. या खेळामध्ये मी शालेय व महाविद्यालयीन जीवनात चांगले यश मिळविलेले आहे. या खेळामुळेच मला पोलीस दलामध्ये काम करण्याची संधी मिळालेली आहे. त्यानंतर मला विकी जोशप यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे मार्गदर्शन मिळाल्यामुळे मी झारखंड येथील स्पर्धेत चांगली कामगिरी करू शकलो, अशी प्रतिक्रिया कपिल गायकवाड यांनी दिली.

LEAVE A REPLY

*