Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

बारामतीच्या एकास अटक

Share

श्रीगोंद्यात बनावट नोटा प्रकरण

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – श्रीगोंदा पोलिसांच्या पथकाने घोगरगाव परिसरात अतुल रघुनाथ आगरकरला ताब्यात घेतले तो बनावट नोटा देऊन सोने खरेदी करणार होता. त्याच्याकडिल दोन लाख 73 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असून ही बनावट नोटांची लिंक थेट बारामतीपर्यंत असून श्रीकांत सदाशिव माने (रा.बारामती) याने या बनावट नोटा दिल्या होत्या. माने याला पोलिसांनी ताब्यात घेतले. या दोघांना श्रीगोंदा न्यायालयासमोर हजर केले असता 12नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

श्रीगोंदा पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गावीत यांच्या पथकाने हा सापळा रचला होता. यात बनावट नोटा घेऊन आलेली ही व्यक्ती 2 लाख 83 हजार रुपये बनावट देऊन सोने खरेदी करणार होती. काळ्या रंगाच्या गाडी मध्ये आलेला अतुल रघुनाथ आगरकर रा.जवळेवाडी, सुपा, हा बनावट नोटा रक्कम रुपये 283000 बाळगताना मिळाला. त्यात 2000 रुपये दराच्या 92 व 500 दराच्या 199 नोटा बनावट बाळगताना सापडला होता त्याने सांगितल्याप्रमाणे पथकाने बारामती येथे श्रीकांत सदाशिव माने याला ताब्यात घेतले या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले त्यांना 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आरोपी बड्या घरचे
पकडण्यात आलेल्या आरोपीकडे आलिशान गाडी असून बारामतीमध्ये ताब्यात घेतलेला आरोपी बड्या घरचा आहे.रात्री या आरोपीला ताब्यात घेतल्यावर बराच गोंधळ आरोपीने केला असल्याचे सांगण्यात आले .पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेऊन बारामती पोलीस स्टेशनला माहिती दिली.

बनावट नोटा छापल्या कुठे?
श्रीगोंदा पोलिसांच्या पथकाने या बनावट नोटा ताब्यात घेतल्या यात दोघांना ताब्यात घेतले असले तरी या बनावट नोटा छापणारी टोळी नेमकी कुठली आहे याचा तपास सुरू आहे.यात काही महिलांचा समावेश देखील असण्याची शक्यता आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!