हिंद सेवा मंडळाचे सहसचिव बापूसाहेब भाटे यांचे निधन

0
अकोले (प्रतिनिधी) – हिंद सेवा मंडळ, अहमदनगर या संस्थेचे सहसचिव व अकोले ब्राम्हण सभेचे संस्थापक अनंत उर्फ बापूसाहेब त्र्यंबक भाटे (वय 74) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वृंदावन (उत्तर प्रदेश) येथे निधन झाले. अनंत भाटे हे नातेवाईक व मित्रांसमवेत उत्तर प्रदेशमध्ये सुरू असणार्‍या भागवत सप्ताहात सहभागी होण्यासाठी गेले होते.
वृंदावन येथे रविवारी दुपारी त्यांना हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. त्यांचा मृतदेह वृंदावन येथून संगमनेर येथे आणण्यात आला व काल मंगळवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अकोले तालुक्यातील धामणगाव आवारी हे त्यांचे मूळ गाव. अकोले येथे त्यांचे वास्तव्य होते.
निवृत्तीनंतर ते संगमनेर येथे स्थायिक झाले. भारतीय स्टेट बँकेतून व्यवस्थापक पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी स्वत:ला सामाजिक कार्यात झोकून दिले होते. हिंद सेवा मंडळाच्या विविध पदांवर त्यांनी काम केले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन विवाहित मुली, नातवंडे असा परिवार आहे. अकोले महाविद्यालयातील निवृत्त प्रा. अशोक भाटे हे त्यांचे कनिष्ठ बंधू होत.

LEAVE A REPLY

*