‘कल्पना एक अविष्कार अनेक’ स्पर्धा रंगल्या; ‘बाप की अदालत’ सर्वोत्कृष्ट एकांकिका

0
नाशिक । ‘कल्पना एक आविष्कार अनेक 2017’ या एकांकिका स्पर्धेत विजय निकम लिखित व दिग्दर्शित ‘बाप की अदालत’ एकांकिका सर्वोत्कृष्ट ठरली. तर व्यासंग, मुंबईची दिनेश जाधव लिखित राजदत्त तांबे दिग्दर्शित ‘तू…मी…ते..इतर..सगळे…’ या एकांकिकेने द्वितीय पारितोषिक मिळवले.

मागील एकतीस वर्षापासून सुरु असलेल्या या स्पर्धेत दरवर्षी महाविद्यालयीन रंगकर्मींबरोबरच हौशी तसेच व्यावसायिक रंगभूमीवरचे कलावंतही आपल्या सृजनशीलतेला वाव देण्यासाठी आवर्जून सहभागी होतात.

स्पर्धेच्या अंतिम फेरीचे परीक्षण रामू रामनाथन, अमित फाळके आणि अरुण नलावडे या नाट्यक्षेत्रातल्या मान्यवर परीक्षकांनी केले. स्पर्धकांना मार्गदर्शन करताना अरुण नलावडे यांनी कलावंतांच्या उर्जेचे विशेष कौतुक केले. लेखकांना महत्व देणारी, नव्या लेखनाला चालना देणारी स्पर्धा म्हणून ओळख असलेल्या या स्पर्धेतले सर्वोत्कृष्ट लेखकाचे पारितोषिक विजय निकम यांना ‘बाप की अदालत’ या एकांकिकेसाठी देण्यात आले.

याच एकांकिकेसाठी ते सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकही ठरले. तसेच पार्श्व अभिनयाचा अभिनव पुस्कारही त्यांना मिळाला. अंतिममध्ये सादर झालेल्या अंतर्नाद मुंबई निर्मित ओंकार भोजने लिखित समीर सचिन दिग्दर्शित ‘माझी बाय’ आणि अंतरंग थिएटर निर्मित रोहन पेडणेकर लिखित- दिग्दर्शित ‘पोलखोल’ या एकांकिकाही उल्लेखनीय होत्या.

LEAVE A REPLY

*