Type to search

‘बँक ऑफ बडोदा’च्या ८०० ते ९०० शाखा बंद होण्याची शक्यता

Breaking News Featured देश विदेश मुख्य बातम्या

‘बँक ऑफ बडोदा’च्या ८०० ते ९०० शाखा बंद होण्याची शक्यता

Share

वृत्तसंस्था | नवी दिल्ली

सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या दुसऱ्या क्रमांकाच्या बँक ऑफ बडोदाकडून देशातील ८०० ते ९०० शाखा बंद करण्याचा किंवा अन्य शाखांमध्ये सामावून घेण्याचा विचार सुरू आहे. दरम्यान, कार्यक्षमता वाढवण्याच्या हेतूने बँक ऑफ बडोदाकडून याबाबत विचार सुरू असल्याचे समजते.

देना आणि विजया बँक या दोन्ही बँकांचे एक एप्रिल रोजी बँक ऑफ बडोदात विलीनीकरण करण्यात आले होते. देना आणि विजया बँकेच्या विलीनीकरणापासून याबाबत विचार सुरू आहे. आता या तीन बँकांची कार्यक्षमता वाढवण्याच्या हेतूने काहीच दिवसात तब्बल ८०० ते ९०० शाखांना टाळं लागण्याची किंवा इतर शाखांमध्ये विलीन करण्याची तयारी सुरु आहे.

एप्रिल महिन्यापासूनच बँकेच्या शाखांचा आढावा सुरु आहे. त्यानुसार काही शाखांचे अन्यत्रस्थलांतर किंवा काही शाखा कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहेत. देना आणि विजया बँकेच्या विलीनीकरणानंतर एकाच ठिकाणी दोन्ही बँकांच्या शाखा चालविण्यात येत होत्या. अनेक ठिकाणी तर तिन्ही बँकांच्या शाखा एकाच इमारतीमध्ये चालत असल्याचे आढळून आल्यामुळे हा निर्णय बँकेकडून घेण्यात येत असल्याचे समजते.

बँक ऑफ बडोदाच्या देशभरात ९,५०० शाखा आहेत. या बँकेचे १३ हजार ४०० एटीएम आहेत, तर एकूण कर्मचारी संख्या ८५ हजार असून ग्राहकसंख्या १२ कोटी आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!