बंगळुरु : डाटावल कंपनीकडून फेसबुकचे आव्हान पूर्ण

0

फेसबुकने 2015 साली दिलेले ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स – एआय’चे आव्हान जगात पहिल्यांदा पूर्ण केल्याचा दावा बंगळुरु येथील एका कंपनीने केला आहे. हे आव्हान 20 तुकड्यांमध्ये विभागलेली एक अवघड प्रक्रिया होती.

डाटावल अॅनालिटिक्स असे या कंपनीचे नाव आहे. या कंपनीने फेसबुकने दिलेले सर्व 20 लक्ष्य पूर्ण केले आहेत. यांना 20 क्यूए बीएबीआय टास्क असे म्हटले जाते. आम्ही हे लक्ष्य 100% अचूकतेने पूर्ण केला आहे, असे डाटावलने म्हटले आहे.

फेसबुक एआय रिसर्चने (फेयर) या चाचणीचे आयोजन केले होते. एआय आधारित कार्यक्रमांचे प्रदर्शन जाणून घेणे आणि समजून घेणे हा त्याचा उद्देश होता.

डाटावल अॅनालिटिक्सचे मुख्यालय शिकागो येथे आहे, मात्र त्याचे कामकाज बंगळुरु येथील कार्यालयातून होते. भारतीय लष्करातील माजी अधिकारी लेफ्टनंट कर्नल शशि किरण आणि लेफ्टनंट कर्नल नवीन झेव्हियर यांनी कंपनीची स्थापना केली होती. प्रसिद्ध उद्योजक, नीतिनिर्माते आणि विचारवंत सॅम पित्रोदा यांनी या कंपनीच्या टीमला प्रशिक्षण दिले असून ते कंपनीचे चेअरमन आहेत.

‘‘फेसबुकने 2015 साली ही चाचणी जाहीर केली होती. अनेक जागतिक कंपन्यांनी यासाठी खूप प्रयत्न केले, मात्र एकही कंपनी यशस्वी झाली नाही,”असे पित्रोदा म्हणाले.

LEAVE A REPLY

*