केळीवरील व्हायरसचे उच्चाटन शक्य

jalgaon-digital
1 Min Read

त्रिचीच्या शास्त्रज्ञांनी रावेर तालुक्यात केली पाहणी

रावेर

काकडी व वेलवर्गीय झाडांवर आदळणार्‍या कुकुंबर मॉझेक व बंची टॉप व्हायरसमुळे रावेर-यावल तालुक्यातील केळी धोक्यात आली आहे. या रोगाचे समूळ उच्चाटन होण्यासाठी सामुहिक पाऊले उचलली गेली पाहिजे. यामुळे केळी बागा रोगमुक्त ठेवता येईल, असे मत त्रिची येथील केळी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ.आर सिल्व्ह राजन यांनी व्यक्त केले.

शुक्रवारी डॉ.सिल्व्ह जळगाव जिल्ह्याच्या दौर्‍यावर होते,त्यांनी यावल तालुक्यातील न्हावी व रावेर तालुक्यातील दसनूर,वाघोदा,चिनावल,याठिकाणी केळी बागांची पाहणी केली.दरम्यान न्हावी येथे त्यांनी बंची टाँप व्हायरस बाबत शेतकर्‍याशी संवाद साधला.पुढे दसनूर व वाघोदा येथे कुकुंबर माँझेक (सी.एम.व्ही.) यावर शेतकर्‍यांना माहिती देतांना सांगितले की, हा व्हायरस वेलवर्गीय पिकांवर 12 महिने असतो, मात्र या पिकांचे आपल्याकडे उत्पादन घेतले जात नसल्याने त्यांचा वाढता प्रादुर्भाव समजत नाही.केळीचे उत्पादन घेतले जात असल्याने सीएमव्ही व्हायरस आल्यावर लक्षात येते.

सीएमव्ही पसरवणारे मावे थंड व दमट वातावरणात अधिक क्षेत्र बाधित करून नुकसान करतात. या व्हायरसचा प्रादुर्भाव झपाट्याने होतो.यामुळे तशी झाडे दिसतात उपटून त्यांना कोरडी करून जळून टाकावी. केळी बागांमध्ये स्वच्छता राखावी. बांधांवर तण होवू देऊ नये. बागा भोवती गिलके, कारले, काकडी यांचे वेल वाढू देऊ नये, यातून व्हायरसचे केळीवर संक्रमण होते. तसेच लागवड करतांना रोपे व्हायरस मुक्त असल्याची खात्री करून लागवड करावी असे मार्गदर्शन त्यांनी केले.यावेळी डॉ.के.बी.पाटील,राहुल भारंबे,विशाल अग्रवाल व शेतकरी उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *