Type to search

आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

नव्या इंजिनीयरिंग कॉलेजना 2020 पासून बंदी

Share
मुंबई : पुढील वर्षापासून महाराष्ट्रासह देशात कोणत्याही नव्या इंजिनीयरिंग महाविद्यालयाला मान्यता मिळणार नाही आणि त्यानंतर नव्या महाविद्यालयांची आवश्यकता आहे का याचा आढावा दर दोन वर्षांनी घेण्यात येणार आहे. इंजिनीयरिंग महाविद्यालयांमधील हजारो जागा रिक्त राहत असल्याने केंद्र सरकारने नेमलेल्या समितीने या शिफारशी केल्या आहेत.

दरवर्षी इंजिनिअरिंगच्या निम्म्याहून अधिक जागा रिकाम्या राहत असल्यामुळे २०२० पासून नव्या कॉलेजची स्थापना थांबविण्यात यावी, असा सल्ला आयआयटी हैदराबादचे अध्यक्ष बी.व्ही.आर. मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वातील सरकारी समितीने ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनला (एआयसीटीई) दिला आहे.

एआयसीटीईचे अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे यांनी सांगितले की, समितीने आपला अहवाल आमच्याकडे सोपविला आहे आणि यावर  तंत्रशिक्षण नियामकांकडून विचार केला जात आहे. आपल्या ४१ पानांच्या अहवालात असा सल्ला देण्यात आला आहे की, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रॉनिक यासारख्या पारंपरिक क्षेत्रात अतिरिक्त जागांना मंजुरी देण्यात येऊ नये.

इंजिनीयरिंगचे जे पारंपरिक अभ्यासक्रम आहेत त्यामध्ये प्रवेश घेण्याचे प्रमाण कमी झाले आहे. कॉम्प्युटर सायन्स, एरोस्पेस इंजिनीयरिंग आणि मेकॅट्रॉनिक्स या नव्या व अत्याधुनिक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे पारंपरिक अभ्यासक्रमांमधील 40 टक्के जागा भरल्या जातात तर या नव्या अभ्यासक्रमांमधील 60 टक्के जागा भरल्या जातात. यावर उपाय म्हणून इंजिनीयरिंगच्या प्रत्येक अभ्यासक्रमामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला पाहिजे, असा सल्लाही रेड्डी समितीने दिला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!